सिंदखेड राजा / वृत्त मास्टर न्यूज नेटवर्क शहरात विविध चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी चोरीचा तपास लावण्याच्या मागणीसाठी दिनांक 4 सप्टेंबर बुधवार रोजी शहरातील सर्व पक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे.
सिंदखेड राजा शहरासह परिसरात सतत विविध चोरीच्या घटना घडत असून या घडलेल्या घटनेचा सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळत आहेत तरी देखील वाढते चोरीचे प्रमाण व चोरांचा शोध लागत नसल्यामुळे सिंदखेडराजा शहरातील नागरिक हैराण झाले आहेत विविध घटनांमुळे शहरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत त्या अनुषंगाने सिंदखेडराजा शहरातील सर्व 1 सप्टेंबर रोजी संत सावता भवन या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शहरातील 100 ते 200 विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी सर्व शहर वासियांच्या वतीने सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशन च्या गलथान कारभाराविरोधात व पोलिसांनी चोरांचा शोध लावण्यात संदर्भात शहरवासियांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत