बुलढाणा /सचिन खंडारे जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी या आडवळणी गावचे भूमिपुत्र तथा माजी गृह सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई चे सहसचिव छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले ,शाहू महाराज,यांच्या विचाराचे पाईक असलेले सिद्धार्थ खरात यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे ,उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ खरात यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला आहे,
सिद्धार्थ खरात नुकतेच 30 वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून एक जुलै रोजी त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली होती,तेव्हापासून सिद्धार्थ खरात हे पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या ,मेहकर मतदार संघामध्ये त्यांनी संपर्क सुद्धा वाढवला होता,मंत्रालय कामकाजाचा सिद्धार्थ खरात यांना तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांनी गृह ,तुरुंग , उत्पादन शुल्क ,शालेय शिक्षण ,महसूल , पणन ,कामगार , पशुसंवर्धन , दुग्ध ,मत्स्यव्यवसाय ,जलसंधाण , रोजगार हमी योजना , ऊर्जा व बंदरे इत्यादी विभागाचे काम त्यांनी सांभाळले आहे त्याचबरोबर अनेक मंत्री महोदयाकडे विशेष कार्यकारी अधिकारी खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे,त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये सिद्धार्थ खरात हे उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळवून शकतात,एक सोज्वळ शांत संयमी व मित्राचा मोठा गोतावळा असलेला नेतृत्व म्हणून सिद्धार्थ खरात यांच्याकडे बघितले जाते ,सिद्धार्थ खरात हे मुंबई येथे जरी नोकरी करत असले तरी त्यांनी गावाकडील त्याचबरोबर सिंदखेडराजा सह बुुलढाणा जिल्ह्यातील लोकांशी कधी नाळ तुटू दिली नाही,त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मेहकर मतदारसंघांमध्ये सिद्धार्थ खरात हे परिवर्तन घडू शकतात अशी चर्चा रंगू लागली आहे,मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी बुलढाणा शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते .