पीस फाउंडेशन तर्फे शरद पवारांना निवेदन  अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा 

देऊळगाव राजा/ प्रतिनिधी  : अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी पिस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही उपस्थिती होती.

मुंबई येथे राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषदेच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे द्वारा आयोजित यशवंतराव चव्हाण मुंबई सेंटर येथील विचार मंथन कार्यक्रमात पीस फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी पीस फाउंडेशन च्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष मिर्झा अफसर बेग, बुलढाणा जिल्हाध्यक्ष हाजी आलमखान कोटकर,हाजी बी.एम पठाण,मोहम्मद रियाजोद्दीन टेलर जालना,मिर्झा कैसर जालना यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी देशाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्या,सामाजिक प्रश्नांबरोबरच सध्या स्थितीत राज्यात उद्भवलेल्या स्त्री सुरक्षा संदर्भात उद्भवलेल्या गंभीर प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी सच्चर समिती व मेहमूदुरहमान कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात यावे, धार्मिक सुरक्षितते बद्दल अल्पसंख्यांक समाजाला राज्यघटनेने ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात यावी. मुस्लिम बहुल विधानसभा क्षेत्रात समाजाच्या सल्ल्यानुसार मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊन नियमांची पूर्तता करून त्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे. एम एल सी सारख्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील नेतृत्वाला संधी देण्यासंदर्भात प्राथमिकतेने संधी देण्यात यावी. महत्त्वाच्या महामंडळावर मुस्लिम प्रतिनिधीला संधी द्यावी तसेच वक्फ हा स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून याचे प्रतिनिधित्व कायम समाजाकडे देण्यात यावे अशा विविध प्रश्न संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आले. अशा प्रकारचे निवेदन पिस फाउंडेशन तर्फे देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *