https://vruttamasternews.com/buldhana-news-11/
सिंदखेड राजा तालुक्यातील ज्या ठिकाणी राष्ट्रीय पेयजल योजना व जलजीवन मिशनचे काम झाले आहेत किंवा सुरू आहेत अशा सर्वांचे ऑडिट करण्याची सचिन खंडारे यांची उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
बुलढाणा /प्रतिनिधी
मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी व ठेकेदार यासाठी पैसे लाटण्यासाठी योजना फायदेशीर ठरलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना व जल जीवन मिशन अंतर्गत सिनखेडराजा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पाणीटंचाई दूर करण्याकरता कामे सुरू आहेत,यामध्ये नवीन नळ योजना नवीन पाण्यासाठी विहीर नवीन नळ व इतर कामे यामध्ये असून काही गावांमध्ये एक कोटी वीस 20 हजार रुपयाची योजना आहे तर काही ठिकाणी दोन कोटी पन्नास हजाराची योजना आहे विषय असा आहे की या योजने करता शासन व केंद्र शासन कोट्यावधी रुपयाचा निधी देत असून एवढ्या पैशांमध्ये हे कामे होऊन सुद्धा बराचसा निधी केवळ संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांनी जुन्या कामावरूनच काम न करता बिल काढण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे, काही ठिकाणी तर विहिरीचा इस्टिमेटनुसार काम न करता विहिरीचा स्पॉट बदलण्यात आला आहे यामध्ये तांदूळवाडी येथील स्पोर्ट बदलण्यात आला असून अशा प्रकारचा स्पॉट कोणालाही बदलता येत नाही,त्यामुळे कोट्यावधीचा निधी येत असताना संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांनी संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनात येत असून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काम पूर्ण झाले नसून याप्रकरणी पत्रकार सचिन खंडारे यांनी आवाज उठवला असून त्यांनी दिनांक 24 मे रोजी उपविभागीय अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग चिखली यांना त्यांनी निवेदन दिले असून चौकशीची मागणी केली आहे तसेच इस्टिमेट नुसार सर्वच कामाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे ,त्यामुळे लवकरच सर्व कामांची चौकशी लागणार असून यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत .