सिंदखेडराजा/ रामदास कहाळे दि.५ सप्टेंबर प्रत्येक शिक्षक हा व्यवस्थित, शिस्तप्रिय आणि वेळेची किंमत असणारा असेल तर त्याला आदर्श म्हणणं योग्य ठरेल. कारण शाळेच्या प्रार्थनेतील उपस्थिती ते शाळा सुटेपर्यंत शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत असतात.शिक्षकाने कुशल वक्ता असणं आवश्यक आहे. जो आपल्या मनातील गोष्ट विदयार्थ्यांपर्यंत योग्य आणि चांगल्या पद्धतीने पोचवू शकेल असे मत डॉ.शिल्पा सुनील कायंदे यांनी व्यक्त केले.
डॉ.शिल्पा कायंदे यांनी आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाष्टा जि.जालना, रूम्हणा सिंदखेडराजा, असोला, देऊळगाव राजा, देऊळगाव मही, दुसरबीड, भुमराळा गावातील तब्बल अडीचशे पेक्षा अधिक शिक्षकांना भेटी देत शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.कायंदे व्यक्त झाल्या. पुढे बोलताना डॉ.कायंदे यांनी शिक्षकांनी योग्य शब्दांचा वापर करणंही अभिप्रेत असतं. कारण शिक्षकांना पाहूनच विद्यार्थी शिकत असतात आणि आचरणात आणत असतात. असे त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी पालकांना विचारात घेऊन हाताळावी. सद्या स्थितीत मुलींच्या सुरक्षीततेचा प्रश्न अनेक भागांमधून समोर आला आहे.अशावेळी मुलींना सुरक्षिततेचे धडे व मार्गदर्शन करत सामाजिक कर्तव्य निष्ठा शिक्षकांनी हाताळावी असे त्या शेवटी म्हणाल्या.