बुलढाणा /सचिन खंडारे केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व समाजातील मुला-मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो,सदर योजना २०२३ – २४ पासून सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या शैक्षणिक वर्षापासून राज्यात” एक राज्य एक गणवेश धोरण ” राबवण्याचा निर्णय घेतला आहे,
सदर १५ जून पासून नियमवली जारी करण्यात आली,तसेच मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा १५ जून पासून सुरू झालेले आहेत,
सुरुवातीला विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे ठरवलेले असताना सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट संपला तरी सुद्धा सुद्धा गणवेशाचे वाटप करण्यात आले नाही,ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल,
ऑगस्ट महिना संपला सप्टेंबर सुरू झाला तरी सुद्धा जिल्हा परिषद मधील शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याच्या कुठल्याही प्रकारच्या हालचाली सध्या तरी प्रशासनाकडून दिसून येत नाही ,राज्य शासन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात गुंग आहे नेतेमंडळी आपापले पक्षाचे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याकडे लक्ष देताना दिसत आहे मात्र त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील त्याचबरोबर राज्यातील ज्या शाळेमध्ये गोरगरीब बहुजनांची मुले शिक्षण घेतात त्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र अजूनही गणवेशाचे वाटप झाले नाही याकडे मात्र लक्ष नाही,
लाडकी बहीण योजने करता शासन करोडो रुपये खर्च करते
त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा मिटवला,मात्र जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश पैकी निदान एक तरी शाळेचा गणवेश कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारने शिक्षण मंत्र्यांनी दिलं पाहिजे
शासन व प्रशासन यांना जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबांच्या मुलांसाठी किती आस्था आहे हे यातून दिसून येत आहे
राज्यसरकारने
,विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळावीत यासाठी राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यासाठी २१५ कोटी ५३ लाखाचा निधी वितरित केला आहे, मग एवढं असून सुद्धा अजूनही जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप का झाले नाही,राज्यात एक गणवेश अंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट,आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट,किंवा हाफ पॅन्ट,तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाचे सलवार कशी रंगाची कमीज
विद्यार्थ्यांच्या शर्ट वरील शोल्डर ट्रिप आणि दोन किसे असणे आवश्यक आहे .
असे गणवेशाचे स्वरूप असणार आहे,
शिवाय गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार व स्काऊट गाईड गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार असे ठराविक दिवस शासनाने ठरवून दिलेले आहेत,सदर स्काऊट गाईडच्या गणवेशा शिलाई साठी शंभर रुपये प्रति गणवेश व अनुवंशिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी 110 रुपये प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करावी अशा सूचनाही देण्यात आलेल्या होत्या मग,एवढे सर्व असताना सुद्धा भारतीय स्वतंत्र दिनाला विद्यार्थी मागील वर्षीच्या शाळेच्या गणवेशावरच ध्वजारोहण करण्याकरता गेले,आता २६ जानेवारी पर्यंत निदान शाळेचा गणवेश मिळावा हीच अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त होत आहे,