बुलढाणा /सचिन खंडारे सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात कार्यरत एएसआय प्रदीप वायाळ यांना पीएसआय पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
गृह विभागाची २३ ऑगस्ट २०२४ रोजीची आस्थापना बैठकी नुसार पोलिस दलामध्ये एकुण ३० वर्ष सेवा पुर्ण केलेल्या किंवा सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर किमान ३ वर्षांपेक्षा अधिक काळ कर्तव्य बजावलेल्या पोलिस कर्मचारी यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार असल्याचे आदेश गृह विभागाने २२ एप्रिल २०२२ रोजी अप्पर पोलिस महासंचालक यांनी लागु केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर तीन वर्षांपासून कार्यरत असुन ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी पोलिस दलात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली यावेळी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ब्रम्हांनंद शेळके यांनी वायाळ यांच्या खांद्यावर स्टार लावून उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना पुढील कारकीर्दीस सुभे च्छा दिल्य. प्रदिप गुलाबराव वायाळ हे तालुक्यातील धानोरा सटवाई येथिल मुळ रहिवासी असुन सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात ते चार वर्षांपासून कार्यरत असुन याअगोदर त्यांनी हिवरखेड,बोराखेडी ,संग्रामपूर, शेगाव,मेहकर यासह जिल्ह्यातील आदी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावलेली आहेत. त्यांना सेवेतील उर्वरित तीन वर्षांसाठी पीएसआय पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. किनगाव राजा पोलिस ठाण्यात शरद ठोंबरे यांनाही सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरुन पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
धानोरा वासियांना पीएसआय पदाचा आनंद
आपल्या गावातील अजुन एक व्यक्ती निरीक्षक पदावर काम करणार आहेत. धानोरा येथील संजय चव्हाण हे मोटार वाहन निरीक्षक असुन आता पुन्हा एक प्रदीप वायाळ यांच्या रूपाने पोलिस उपनिरीक्षक झाल्याने धानोरा वासियांना आनंद झालेल्या पाहवयास मिळत आहे.