रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी शंकर मलवार यांची नियुक्ती.

चिखली / प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली येथे पाच सप्टेंबर रोजी पार पडलेल्या भव्य प्रवेश सोहळ्यामध्ये शेकडो महिला पुरुषांचा पक्षप्रवेश झाला .यावेळी शंकर मलवार यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

तथागत भगवान गौतम बुद्ध ,

डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रदेश सचिव वैभव धबडगे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड वाशिम जिल्हा विधानसभा अध्यक्ष विकी डोंगरे यांच्यासह बुलढाणा जिल्हा प्रभारी व निरीक्षक अंबादास घेवंदे यांचीही भाषणे झाली.

प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी आपल्या भाषणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ध्येयधोरणे स्पष्ट केले. मेहकर विधानसभाा राखीव असल्याने ताकतीने लढणार आणि उमेदवार निवडून आणणार असल्याचे म्हटले पुढील येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढणार .आतापासूनच बूथ बांधणीचे नियोजन करण्याचे त्यांनी पदाधिकारी ,कार्यकर्ते यांना सूचित केले.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शंकर मलवार यांनी केले .बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकतनी वाढवणार असल्याचे शंकर मलवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता विकी भैया सिद्दिकी ,सतिश पंडागळे ,सुनील साळवे ,सिद्धार्थ बोर्डे ,भगवान खरात ,संतोष मलवार ,सिद्धू भंडारे ,सुनील मलवार,कुणाल सरदार ,सम्राट मलवार, आकाश मलवार संजय निकाळजे ,सुनील वाघ, दीपक वाघ,योगेश खरात ,नितीन साळवे ,सागर काळे ,विनोद वानखेडे ,सागर वानखडे, शेख रशीद ,अनिल साळवे ,राहुल जाधव ,जितू राऊत ,बाळू गवारे यांनी अथक परीश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन दादाराव सुरडकर तर आभार रविद्र वाघ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *