सिंदखेडराजा/ सचिन खंडारे सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे सोपान केदार यांच्या साई ट्रेडिंग कंपनीच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सोयाबीन खरेदीला प्रारंभ केला असून शुभारंभ चा भाव नवीन सोयाबीनला ४ हजार ८oo मिळाला आहे
नवीन सोयाबीन येण्याला सुरुवात झाली असून गणेश गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आगेफळ येथील प्रगतशील कास्तकार सत्यनारायण पांचाळ पाटील यांनी १३ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते या सोयाबीनला चार हजार आठशे रुपयांनी मुहूर्तावर खरेदी केले यावेळी कास्तकार सत्यनारायण पाटील यांचा साई ट्रेडिंग कंपनीच्या वतीने सोपान केदार आणि दिपक केदार यांनी टोपी आणि रुमाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच विजय डिघोळे रामाभाऊ शिंगणे राजु मुठ्ठे उमेश छबिले गजानन घुगे आटोळे सागर मुसदवाले आदी सह शेतकरी उपस्थित होते