Buldhana news गजानन पेट्रोल पंपाची कॅश लुटणारे चोरटे जेरबंद

 

https://vruttamasternews.com/buldhana-news-12/

गजानन पेट्रोल पंपाची कॅश लुटणारे चोरटे जेरबंद

 

गोपनीय माहितीच्या आधारे लावला चोरट्याचा छडा

 

९६ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

बुलढाणा /प्रतिनिधी मुंबई नागपूर महामार्गावरील नसराबाद येथील गजानन पेट्रोल पंपा वरून कॅश घेऊन शहराकडे येत असताना  चोरट्यांनी  1 लाख 96 हजाराची रोक रक्कम 3 मे रोजी लुटली होती त्या अंतर्गत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कसून तपास करून 27 मे रोजी ९६ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल सह  तीन चोरट्यांना जेरबंद केले आहेत

सविस्तर हकीकत दिनांक 04/05/2024 रोजी फिर्यादी विष्णु प्रल्हाद खरात वय 37 वर्ष व्यवसाय गजानन कॉर्पोरेशन माळसावरगांव

पेट्रोल पंपावर मैनेजर, रा. तुळजापुर यानी रिपोर्ट दिला की, नमुद फिर्यादी हे नमुद पेट्रोलपंपावर मैनेजर या

पदावर काम करीत असून दिवसभरात जमा झालेली रक्कम सायंकाळी पेट्रोल पंप मालक किरण तायडे यांचे कडे सिंदखेड राजा

येथे जमा करण्यास येत असतात दिनांक 03/05/2024 चे रात्री 20/00 वा सुमारास मॅनेजर पंपावर जमा झालेली रक्कम नगदी

1,96,130/- रुपये अक्षरी (एक लाख शहान्नव हजार एकशे तीस रुपये) घेवून मोटार सायकल ने येत असतांना पाठीमागुन दोन

इसमाने मो सा वर येवुन मॅनेजर यांना मारहाण करून मॅनेजर जवळील नगदी 1,96,130/- रुपये जबरदस्तीने हिसकावुन घेवून पळुन गेले अशा आशयाचे रिपोर्ट वरून नमुद गुन्हा नोंद करण्यात आला

होता. गुन्हयाचे तपासामध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदखेड राजा व स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यानी संमातर तपास करून आरोपी बाबत कोणताही सुगावा नसतांना तांत्रीक तपासाद्वारे व गोपनीय बातमीद्वारे आशिष भास्कर

मोरे रा नसिराबाद यास अटक करून पुढील तपास केला असता नमुद गुन्हयात आरोपी 2) तातेराव छगन जाधव वय 33 वर्ष

रा. नसिराबाद ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा 3) महेश ऊर्फ बाली ज्ञानेश्वर सोनुने वय 24 वर्ष रा. छोटा बौध्दवाडा सिंदखेड

राजा जि.बुलडाणा यांचा सहभाग असल्याने त्यांना वेगवेगळया ठिकाणाहून अटक करून आरोपीतांचा दिनांक 27/05/2024

रोजी पावेतो पिसरीआर घेवून तपास केला असता गुन्हयातील आरोपी 1) आशिष भास्कर मोरे वय 19 वर्ष रा. नसिराबाद ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा. 2) तातेराव छगन जाधव वय 33 वर्ष रा. नसिराबाद ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा 3) महेश ऊर्फ बाली ज्ञानेश्वर सोनुने वय 24 वर्ष रा. छोटा बौध्दवाडा सिंदखेड राजा जि. बुलडाणा गुन्हयातील चोरलेले नगदी पैसे, गुन्हा

करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन मोबाइल, गुन्हयात वापरलेली

काठी तसेच पंपावरील असा एकुन नगदी व मुददेमाल 96,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री सुनिल कडासणे, अपर पोलीस अधिक्षक श्री बी.बी. महामुनी, उपविभागीय

पोलीस अधिकारी श्रीमती मनिषा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदखेड राजा व स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा

यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदखेड राजा करीत आहे.

 

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केल्याने सिंदखेडराजा परिसरामध्ये पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *