मेहकर/प्रतिनिधी. मेहकर – लोणार विधानसभा मतदार संघातील महिला, युवतींसाठी गौरी महालक्ष्मी सजावट ऑनलाइन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत मेहकर लोणार मतदार संघातील जास्तीत जास्त महिला,युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंत्रालयीन सेवानिवृत्त सहसचिव तथा शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी केले आहे. सदर स्पर्धा ही महिलांसाठी एक पर्वणी असून महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभाग वाढावा, त्यांचा सन्मान व्हावा त्यांचा उत्साह वाढवा या उद्देशाने ही स्पर्धा ठेवण्यात आली असून सर्वोत्कृष्ट आकर्षक देखाव्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 5001, द्वितीय 3001 तृतीय 1001 तर इतर शंभर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेले आहे, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, तरी सर्व महिलांनी युवतींनी देखाव्याचे आकर्षक फोटो व्हिडिओ 15 सप्टेंबर 2024 पर्यंत 7972892256 या मोबाईल नंबर वर स्पर्धकांचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर देखावा व्हिडिओ व फोटो व्हॉटसअप वर पाठवावे असे आवाहन मंत्रालयीन सेवानिवृत्त सहसचिव तथा शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी केले आहे, तर ही स्पर्धा मेहकर लोणार मतदार संघातील महिला,युवतींन साठी मर्यादित असून कोणतीही प्रवेश फी नाही,विना शुल्क प्रवेश आहे, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धेसाठी वयाची अट नाही तर सदर स्पर्धकांचे बक्षिसे हे मेहकर येथील भव्य अशा कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल याची सर्व सहभागी स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.