कैलास आंधळे / मेरा बुद्रुक चिखली तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येच्या गाव असलेले मेरा बुद्रुक येथे शाळा,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,बाजार गल्ली चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक सह अनेक मुख्य ठिकाणी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या संकल्पनेतून मेरा बुद्रुक येथे सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतचे सचिव,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनातून दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी बसविण्यात आले.सदर सीसीटीव्ही कॅमेरे हे सौर ऊर्जावर स्वयंचलित असल्यामुळे व थेट पोलीस स्टेशनची कनेक्ट असल्यामुळे २४ तास पोलीस स्टेशनची नजर असणार आहे. मेरा बुद्रुक येथील शाळेत चंदनपुर,मनुबाई,गुंजाळा येथील विद्यार्थी,विद्यार्थिनीची संख्या बरीच असल्यामुळे मेरा बुद्रुक येथील प्रत्येक हालचालीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.त्यामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही तसेच या गावामध्ये येणारे वाहनावर सुद्धा नजर असणारा असून चोरीचे प्रमाणावर निश्चितच आळा बसणार आहे.मेरा बुद्रुक येथे श्री. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.या अगोदर चिडीमार करणाऱ्यांचे सुद्धा अगोदर प्रकार घडले आहेत त्यावरही सुद्धा आता तिसऱ्या डोळ्याची कडक नजर असणार आहे.त्यामुळे या ठिकाणी आता चिडिमार,चोर,दरोडेखोर यांच्यावर सुद्धा आळा बसणार आहे.तसेच मेरा बुद्रुक गावातील प्रत्येक हालचालीवर अंढेरा पोलीस स्टेशनच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असल्यामुळे कोणताही वाईट प्रकार घडणार नाही.यावर अंढेरा पोलीस स्टेशन लक्ष ठेवून असणार आहे.त्यामुळे वाईट कृत्य करणाऱ्या वर सुद्धा आळा बसणार आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या संकल्पनेतून या अगोदर मेरा खुर्द,काटोडा,भरोसा, पिंपळवाडी,मिसाळवाडी, शेळगाव आटोळ,इसरुळ सह अनेक गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २५ टक्के गावावर सध्या सि.सि.टीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे.यानंतरही अविरत टप्प्याटप्प्याने अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठाणेदार विकास पाटलाचा मानस आहे.यावेळी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील,ग्रामपंचायत सरपंच सौ.अनिताताई वायाळ, औषध निर्माण अधिकारी पवार मॅडम,उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे,सचिव प्रदीप साळवे,ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, सत्तार पटेल,बाबुलाल जोहरे,अमर पडघान,सागर पाटील,राजेंद्र पाटील,विजू पाटील,अमोल पडघान,सरपंच पती लक्ष्मण वायाळ,पत्रकार प्रताप मोरे,कैलास आंधळे,सुनिल अंभोरे,मुबारक शहा सह गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
Offcanvas menu