मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यानी बाधली एकीची वज्रमूठ

सिंदखेड राजा/प्रतीनिधी सर्व बौद्ध समाजाची समविचारी लोकांची सिंदखेडराजा मतदार संघातील सामाजिक राजकीय संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर माजी लोकसभा सदस्य खासदार सुखदेव काळे यांचे अध्यक्ष खाली आंबेडकरी चळवळीतील धुरंदर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली यावेळी बऱ्याच दिवसापासून असंघटित असलेला समाज एक संघ करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात येऊन आंबेडकरी समाजात असलेल्या विविध समस्या मुलभूत गरजा ओळखून तसेच अन्याय अत्याचारावर तोडगा काढण्यासाठी समाजाच्या सदर बैठकीत निर्धार करण्यात येऊन सामाजिक मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीची एक मोट बांधण्यात आली

 

यत्या कोअर कमिटीच्या आधारावर आंबेडकरी चळवळीचे काम मोठ्या जोमाने करून येत्या 9 आक्टोबर ला कोअर कमिटीची स्थापना करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला यावेळी विविध राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजाला एकसंघ करण्याच्या आव्हान करण्यात आले समाजाने सुद्धा या बैठकीत समाज एक संघ राहण्याचा  निर्धार करण्यात आला पुढील रणनीती आणि दिशा ठरणे 9  ऑक्टोबर  रोजी सिंदखेडराजा या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती यावेळी देण्यात आली

या सहविचार सभेचे सुत्रसंचालन बालु भाउ मस्के व आभार उध्दवभाऊ वाकोडे यांनी केले

या वेळी समाजातील बिनीचे शिलेदार जेष्ठ नेते भाई बबनराव म्हस्के, गोल्डमेन भाई दिलीपजी खरात, अर्जुनदादा गवई,भाई भिकाजी इंगळे,भाई ब्रम्हाभाऊ पाडमुख,अर्जुनभाऊ काकडे, प्रकाश गाडेकर, जेष्ठ पत्रकार रामदास कहाळे, शरदचंद्र वाघमारे नागवंशी, सिध्दार्थभाउ जाधव, तान्हाजी सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे, मनोहर विनकर,हिम्मतराव काळे,भाई दिपक कासारे, पत्रकार गजेंद्र गवई, पत्रकार राहुल झोटे,सचीन खंडारे, संदीप इंगळे,आकाश कासारे, मधुकर शिंदे , उध्दव वाकोडे,किशोर पाडमुख, भाई गजानन निकाळजे,प्रताप लिहिणार,केरुबा लिहिणार,मदन म्हस्के,गौतम खरात, विशाल गवई ,अनिल काकडे,मानिक जाधव, प्रमोद रंधवे या सह सर्वच तोलामोलाचे ज्ञात अज्ञात चळवळीतील जेष्ठ कनिष्ठ विचारवंत मंडळी, नोकरदार वर्ग, शेतकरी कामगार वर्ग, पत्रकार वर्ग या सह सर्व मान्यवर उपस्थिताचे मार्गदर्शन झाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *