गणपती विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करा – जिपोअ – विश्व पानसरे

बुलढाणा/ सचिन खंडारे आगामी गणेश विसर्जन मिरवणूक त्याचबरोबर येणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहामध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते,

सदर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी यांचा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व साखरखेडा ठाणेदार गजानन करेवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचबरोबर साखरखेर्डा गावकऱ्यांच्या वतीने सरपंच सुनील जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सुद्धा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये मागील काळात घडलेल्या घटना पुन्हा घडू नये  यासाठी सर्वांनी सहकार्य करावे गणेश विसर्जन त्याचबरोबर ईद-ए-मिलाद सण शांततेत साजरे करावे सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगितले

त्यानंतर नागरिकांमधून माजी प्राचार्य संतोष दसरे यांनी मिरवणुकीच्या दरम्यान विजेच्या समस्या बद्दल अडचणी सांगितल्या,त्यानंतर माजी सरपंच दाऊदशेठ कुरेशी त्याचबरोबर समाजभूषण माजी सैनिक अर्जुन गवई ,गोपाल ठाकूर अस्लम अंजूम ,यांनी सुद्धा थोडक्यात आपले विचार व्यक्त केले,त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी रासायनिक गुलाल यावर जिल्हाधिकारी यांनी बंदी आणली असून त्याच्या दुष्परिणाम सांगितले तसेच पोलीस सर्वांच्या सोबत असून उत्साहात सण साजरी करावे असे सांगितले,त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी यांनी सांगितले की प्रत्येक मंडळात एक दोन जण असे असतात की ते दंगली घडवण्याचे काम करतात परत राजकीय नेते आमच्यावर दबाव टाकून ते चांगले कसे आहेत याची पावती देतात कोण कसे वागतो ते प्रत्येक मंडळातील सदस्यांना माहीत असते त्यामुळे त्यांनी त्यांना समजावून सांगावे त्याचबरोबर मिरवणुकीत येणारे अडचणी रस्ते खराब असतील तर त्यावर ग्रामपंचायतने मुरूम टाकावा विजेच्या तारा लोंबकाळत असतील तर त्या व्यवस्थित कराव्या,हे सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे काही तरुण जोश मध्ये असतात परंतु त्यांचा होश ज्येष्ठांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावर आवर घालावा,मिरवणूक शिस्तीत चालविण्याकरता पोलीस मध्ये मध्ये येत असतात ते आम्हाला करावे लागते त्यामुळे येणारे सण शांततेत साजरी करावे असे सुद्धा यावेळी महामुनी यांनी सांगितले,

 

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बोलताना सांगितले की विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे न लावणे बाबत तसेच डीजेच्या आवाजामुळे होणारे दुष्परिणाम तसेच आवाजाच्या मर्यादेबाबत लेझर लाईट मुळे होणारे दुष्परिणाम तसेच लेझर लाईट न लावण्याच्या बाबत धार्मिक स्थळे जास्त वेळ मिरवणूक न थांबवण्याबाबत तसेच जिल्हाधिकारी यांचा आदेश रासायनिक गुलाल न वापरण्याबाबत सूचना देऊन गणेश विसर्जन मिरवणूक त्याचबरोबर ईद-ए-मिलाद शांततेत साजरी करावी असे सांगितले,तसेच जे गणेश मंडळ मिरवणूक शांततेत काढतील चांगले देखावे सादर करतील अशांचे स्थानिक समितीमार्फत निरीक्षण करून त्यांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे,,

 

सदर बैठकीला सरपंच पती सुनील जगताप , उपसरपंच

सय्यद रफिक,

जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते रामभाऊ जाधव भाजपा जेष्ठ नेते रावसाहेब देशपांडे,माजी सरपंच महेंद्र पाटील,मा सरपंच कमलाकर गवई,दिलीप बेंडमाळी,ललित शेठ अग्रवाल,मा सरपंच दाऊदशेठ कुरेशी,माजी सैनिक समाज कार्यकर्ते अर्जुनराव गवई,अंकुर देशपांडे,रामदास सिंग राजपूत,सुरेश सिंग राजपूत,संतोष सिंग राजपूत,गोपाल सिंग राजपूत,सामाजिक कार्यकर्ते गोपाल शिराळे,संदीप मगर,ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, शुभम राजपूत,बद्री बोडके,डॉक्टर नीलम महाजन मंगल सिंग राजपूत मंगेश राजपूत,दत्ता लष्कर , अस्लम अंजूम,कैलास ढोलेकर, अरुण देशमुख,अरुण वाघ,सुशील चव्हाण सुनील रिंढे,कवी रामदास कोरडे, शिवदास रिंढे, रहिम शहा,गणेश शिराळे देवानंद खंडागळे गजानन कुले, अमोल दानवे, जीवन गवई,यांच्यासह साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचे पोलीस पाटील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शांतता समितीचे सदस्य त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते,यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रख्यात कवी नामवंत निवेदक नवाज राही यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले,जिल्हा पोलीस अधीक्षक येणार असल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी गृह रक्षक दलाचे कर्मचारी गणवेश यामध्ये शिस्तीत दिसले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *