सिंदखेड राजा/ प्रतिनिधी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला, बिजनेस कॉन्फरन्स या विषयास अनुसरून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात उद्या दिनांक 5 ऑक्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उद्योग व्यवसायाच्या जागतिक संधी आणि आव्हाने समाजकारणातून अर्थकारणाकडे या विषयावर
प्रमुख मार्गदर्शक प्रविंण दादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे
सत्कारमूर्ती सुनील शेळके, दिग्दर्शक व महापरिनिर्वाण चित्रपट ,
संजय वायाळ, ईश्वर बायोटेक ली,
संदीप राजे जाधव, उद्योजक नवी दिल्ली,
शाहीर रामदास कुरगळ ,महाराष्ट्र भर चळवळ पोहचविंण्याचे काम,
आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरातील जिजाऊ भक्ता सह बेरोजगार युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन
बिजनेस कॉन्फरन्स कमिटी मातृतीर्थ सिदखेडराजा यांनी केले आहे