सिंदखेडराजा /सचिन खंडारे सिंदखेडराजातालुक्यातील साखरखेर्डा येथील विविध किराणा दुकानांमधून अनेकांनी नवरात्र असल्यामुळे उपवासाकरिता भगर खरेदी केली होती व घरी गेल्यानंतर भगरीची भाकरी खाल्ल्यामुळे साखरखेर्डा परिसरातील २७५ जणांना मळमळ , उलट्या संडास पोट दुखणे असा त्रास होऊ लागला
त्यामुळे तातडीने त्यांना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले सदर घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली वैद्यकीय डॉ अधिकारी संदीप कुमार सुरुशे यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले उपचारानंतर रुग्णांना बरे वाटत असल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली यामध्ये पिंपळगाव सोनारा येथील ५० रुग्णांचा समावेश आहे तर काही रुग्ण साखरखेर्डा येथील आहे ,त्यामुळे आणखीन काही रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे , सिंदखेडराजा तालुक्यात अनेक किराणा दुकानांमध्ये मुदतबाह्य वस्तूची विक्री होत आहे यामध्ये साबण सामान भगर चिप्सचे पाकीट खाद्यतेल ,व इतर पॅकिंगच्या वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ग्राहक सुद्धा कुठल्याही प्रकारची खात्री न करता वस्तू विकत घेत आहे त्यामुळे नियम व कालबाह्य वस्तू कोणीही घेऊ नये भगर घेताना काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरुशे यांनी केले आहे ‘ तर दुसरीकडे दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक बोगस माल विक्रीसाठी येत असतो त्यामुळे अन्न व औषध प्रशासन हे सुस्त असून त्यांनी विविध तालुक्यांमध्ये पथक नेमून प्रत्येक दुकानाची त्याचबरोबर इतर वस्तूची तपासणी करावी अशी मागणी सुद्धा होत आहे ,
कोणी जर मुदतवाह्य वस्तू विकत घेतली असेल तर त्याची तक्रार ग्राहक रक्षक समितीच्या माध्यमातून करावे नक्कीच त्यांना न्याय मिळेल.