बोलीभाषा सर्जनशीलतेचे मूळ स्रोत  डॉ. उत्तम अंभोरे 

सिंदखेड राजा/प्रतिनिधी   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीभाषेतून व्यक्त व्हावे. सभोवतालच्या प्रश्नांचे,समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून ते साहित्याच्या माध्यमातून व्यक्त झाल्यास चांगली सर्जनशील निर्मिती होऊ शकते अर्थातच बोलीभाषा सर्जनशीलतेची मूळ स्त्रोत आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उत्तम अंभोरे यांनी केले.

सि.राजा येथील उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग अंतर्गत मराठी भाषा व वाड;मय मंडळाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी डॉ. सुनील पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उत्तम अंभोरे हे होते. उपप्राचार्य सुनील सुरूले व मराठी विभाग प्रमुख प्रा. संदीप अवसरमोल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी वाड;मय मंडळाची भूमिका प्रास्ताविकेतून विशद करताना प्रा. संदीप अवसरमोल यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाड;मयीन अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित व्हावे ही या मंडळाची भूमिका आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रसिद्ध कवी डॉ. सुनील पवार प्राचार्य डॉ. उत्तम अंभोरे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. तसेच मराठी वाड;मय मंडळ कार्यकारणीची फित कापून रीतसर उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी कार्यकारणी मंडळाचे मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी जगदीश जाधव यांनी भ्रष्टाचार या विषयावर कविता सादर केली. उद्घाटनपर बोलताना कवी डॉ. सुनील पवार यांनी ‘मला कविता भेटली’ या सदराखाली अनेकविध कविता सादर केल्या. कविता ही काळजातून यावी लागते मेंदूतून नाही मेंदूतून येतो तो बुध्यांक आणि काळजातून येतो तो भावनांक. कविता हे भावनांकाचे प्रतिनिधित्व करते. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यातूनच लेखक कवी निर्माण होत असतात. म्हणून महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा वाड;मय मंडळाची नितांत गरज असते.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. मल्लिकार्जुन कोथळीकर,प्रा. उदय म्हस्के प्रा. पांडुरंग तांबेकर,प्रा. अक्षय कुरंगळ, प्रा. वीरेंद्र तायडे,डॉ. संगीता बावस्कर, प्रा. स्नेहांकिता पुंडकर तसेच इतर कर्मचारी शुभम भाग्यवंत, विश्वंभर मराडे, नरेश जाधव, सचिन खरात तसेच विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नरहरी राऊत तर आभार प्रा. संदीप अवसरमोल यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *