बुलढाणा / प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असणारे रोखठोक पत्रकार सचिन मधुकर खंडारे यांची भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षण समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ सौ . आशाताई पाटील ,यांनी दिनांक 14 सप्टेंबर रोजी दिली आहे,सदर शिफारस महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने यांनी केली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्राहक समितीमार्फत लवकरच भव्य दिव्य मेळावा घेणार असल्याचे यावेळी सचिन खंडारे यांनी सांगितले, ज्या ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते उदा . किराणा दुकान मेवा ड दुकान
इतर ठिकाणी ग्राहकाचे फसणूक होत असेल अशा ठिकाणी ग्राहकांना मार्गदर्शन करून योग्य ती न्याय त्यांना मिळून देण्यासाठी सदर समिती काम करत असते, सचिन खंडारे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांची निवड झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्राहक रक्षण समितीमार्फत ग्राहकांना मोठा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची निवड झाल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .