डॉ. गंगाराम उबाळे यांची “ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती च्या “विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख “पदी पदोन्नती. 

बुलढाणा / प्रतिनिधी  भारत सरकार नोंदणीकृत “माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन” संचालित ” ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती” चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे यांनी “विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख “पदी डॉ. गंगारामजी उबाळे यांची एका नियुक्ती पत्राद्वारे पदोन्नती केली आहे.या अगोदर ते”बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी” विराजमान होते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष असताना त्यांची अतुलनीय कामगिरी, संघटन, ग्राहकांची जनजागृती, ग्राहकांच्या हितासंबंधी कार्य पाहता त्यांना विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख पदोन्नती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. “ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा” उद्देश केंद्र सरकार व राज्य शासनाला मदत व सहकार्य करणे हा आहे. नवनियुक्त पदोन्नती झालेले डॉ. गंगारामजी उबाळे हे समाजकार्यात अग्रेसर असून, एका नामांकित साप्ताहिक वृत्तपत्राचे ते मुख्य संपादक आहेत. पत्रकार आहे.” बुलढाणा चौफेर यूट्यूब चैनल” व “पोर्टल” सुद्धा ते चांगल्या प्रकारे चालवितात. तसेच खाजगी पशुवैद्यकीय सेवा ही देतात त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. याचा फायदा नक्कीच समितीला होईल. व ग्राहक चळवळीसाठी, जनजागृतीसाठी, व ग्राहकभोक्ता संरक्षण समितीच्या हितासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. मला दिलेल्या ” विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख “पदाची जबाबदारी व माझ्यावर “ग्राहकभोक्ता संरक्षण समितीचे” राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे यांनी टाकलेला विश्वास अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडील अशी त्यांनी ग्वाही दिली. लवकरच विदर्भामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून समितीचा विस्तार करण्यात येईल. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सर्व या अगोदरचे पदाधिकारी व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करेल व यासाठी सर्वांनी मला सहकार्य करावे असे आव्हान देखील त्यांनी केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *