https://vruttamasternews.com/buldhana-news-13/
मातृतीर्थ सिंदखेडराजा शहर व परिसरात उत्खनन केल्यास ऐतिहासिक ठेवा समोर येण्याची शक्यता
वृत्त मास्टर न्यूज वृत् सेवा
सिंदखेडराजा या ऐतिहासिक नगरीमध्ये उत्खनन केल्यास पुरातन ऐतिहासिक फार मोठा ठेवा उजेडात येऊ शकतो राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनन केल्यानंतर महादेवाचे मंदिर निघाले यासारख्या अनेक पुरातन ऐतिहासिक वास्तु जमिनीखाली दबलेल्या असू शकतात त्यामुळे सिंदखेडराजा येथील विविध ऐतिहासिक वास्तू जवळ उत्खनन करण्याची गरज निर्माण झाली आहे जेणेकरून दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा जगासमोर येऊ शकतो त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे अशी मागणी राजे जाधव परिवार जिजाऊ भक्त शिवभक्त यांच्याकडून होत आहे
थोडक्यात सविस्तर विषय असा आहे की सोळाव्या शतकामधील राजे लखुजीराव जाधव यांच्या काळामध्ये असलेल्या अडगावराजा या ठिकाणी सप्त धातू च्या सात तोफा सापडल्या असल्याने हे ठिकाण शस्त्र साठ्याचे ठिकाण होते या वरून दिसून येते त्याच बरोबर सिंदखेडराजा शहराची लोकसंख्या 46000 होती जाधव यांचे दहा हजार सैनिक हत्ती घोडे नोकर चाकर फार मोठा लावा जमा येथे राहत होता अत्यंत संपन्न व वैभवशाली ही नगरी होती राजे लखुजीराव जाधव यांनी राज्यकारभार चालवण्यासाठी सिंदखेडराजा नगरीमध्ये अनेक वास्तूचे निर्माण केले होते जगाच्या पाठीवर अशा दुर्मिळ वस्तू इतरत्र कुठेही नाही मात्र काळाच्या ओघांमध्ये हे सर्व वैभव लयास गेले केंद्रीय पुरातत्व खातं व राज्यपुरातत्व खात यांनी सिंदखेड राजा नगरीमध्ये ठिकठिकाणी ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात खोदकाम केल्यास अपरिचित इतिहास जगाच्या समोर येऊ शकतो
सिंदखेडराजा शहरांमध्ये अनेकांना घर बांधकाम करीत असताना खोदकाम केल्यानंतर जुन्या काळातील सोने चांदी व इतर मौल्यवान वास्तू सापडतात आशि सिंदखेडराजा शहरात चर्चा आहे अनेकांना याचा लाभ होऊन ती गर्भ श्रीमंत झाल्याच्या सुद्धा चर्चा या परिसरात आहे
राजे लखुजीराव जाधव यांचा खजिना नेमका कुठे ठेवला आहे याच्या सुद्धा अमिषा पोटी अनेक जण सिंदखेड राजा शहर व परिसरात अमावस्या व पौर्णिमा या काळात त्याचा शोध घेताना च्या चर्चा आहे ऐतिहासिक पुतळा बारव व इतर ठिकाणी खोदकाम केल्यामुळे ऐतिहासिक वास्तूचे नुकसान सुद्धा झाले आहे
अनेकांना घर बांधकाम करीत असताना मूल्यवान दगडी मुर्त्या सुद्धा लागतात तसेच शहरातील अनेक मंदिराजवळ नक्षीकाम केलेल्या दगडी मुर्त्या पाहायला मिळतात त्याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे