साखरखेर्डा येथे किराणा दुकानातून गुलाल जप्त ,  गुलाल नाही तर विसर्जन नाही , गणेश मंडळाचा पवित्रा 

सिदखेडराजा / सचिन खंदारे    श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत केमिकल युक्त गुलाल घेण्यास शासनाने बंदी घातली असता काल एका किराणा दुकानातून गुलाल जप्त करण्यात आला . त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी काल १४ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन गुलाल नाही तर गणपती विसर्जन होणार नाही . असा पवित्रा मंडळांनी घेतला .

साखरखेर्डा येथील बेंदाडे यांच्या किराणा दुकानातून केमिकल युक्त गुलाल ठाणेदार गजानन करेवाड यांनी जप्त केला . बुलढाणा जिल्ह्यात ही घटणा प्रथमच घडली असून यामुळे गणेश भक्ताता तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . गणेश मंडळांना केमिकल युक्त गुलाल एवजी हर्बल गुलालाचा वापर करण्यात यावा . असा आदेश पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करीत सुचणा दिल्या आहेत . परंतू बाजारात हर्बल गुलाल उपलब्ध नसल्याने गणेश भक्तांनच्या उत्साहाला अर्थ राहिला नाही . अशी प्रतिक्रिया सर्वच म़डळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे . गुलाल नाही तर विसर्जन होणार नाही असा पवित्रा काहींनी घेतला . यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . यावेळी गोपाल पाझडे , गोपाल शिराळे , सिताराम काळे , दिलीप बेंडमाळी यासह सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते .

——————————————————-

गणेशोत्सव मिरवणूकीत गुलाल उधळणे ही आमची संस्कृती आहे . निवडणुकीत गुलाल उधळण्याला बंदी नसते . त्यात सर्वच समाजांचे नेते गुलाल अंगावर घेतात . केवळ गणपती विसर्जन मिरवणूकीत गुलाल उधळणे गुन्हा आहे का ? असा प्रश्न उपस्थित करुन गुलाल नाही तर विसर्जन होणार नाही असा पवित्रा आम्ही घेतला आहे .

संतोष मंडळकर

अध्यक्ष तंटामुक्ती समिती , साखरखेर्डा

——————————————————–

डी जे बंदी , वाद्य बंदी , गुलाल बंदी हे कायदे केवळ हिंदू समाजावर लादले जात असतील तर हा निर्णय चुकीचा आहे . गुलाल उधळीत विसर्जन मिरवणूक काढली जाणार .

गोपाल राजपूत

शिवसेना कार्यकर्ते

——————————————————

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे . आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी असा आमचा प्रयत्न आहे . सर्वांनी सहकार्य करावे .

गजानन करेवाड ,

ठाणेदार , साखरखेर्डा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *