बुलढाणा /सचिन खंडारे सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील मुख्य रस्त्याचे काम गेल्या बारा महिन्यापासून कासव गतीने सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून,संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हेतू पुरस्कार नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे,त्यामुळे दि १३ सप्टेंबर रोजी शेंदुर्जन येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे,या निवेदनात नमूद केली आहे की शेंदुर्जन हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने सुलतानपूर लोणार त्याचबरोबर सिंदखेडराजा बीबी तसेच समृद्धी महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे,आणि या रस्त्याचे काम हे उच्च दर्जाचे झाले पाहिजे म्हणून अनेक ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना सुद्धा दिलेले होत्या परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सदर रोडच्या एका बाजूला नाल्याचे अर्धवट काम करण्यात आले आहे तर दुसऱ्या साईटच्या बाजूला नाल्यांचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला नाही,व रोडचे काम सुरू केले या कामावर शासनाच्या नियमानुसार अंदाजपत्रक लावण्यात येते परंतु आतापर्यंत अंदाजपत्रक नसल्यामुळे कोण ठेकेदार आहे कामाचे अंदाजे किंमत किती कामाची दिशा कशी हे मात्र न समजण्यासारखे झाले आहे,सदर मुख्य रस्त्याचे काम हे ३ कोटी ९२ लाख ३३ हजार रुपये किमतीचे असल्याचे समजते हे काम करत असताना रस्ता खोदून त्यावर खडी टाकून दबाई करायला हवी परंतु तशी झाली नाही रोडवर सिमेंट व गिट्टी टाकून काम केल्या जात आहे,काही ठिकाणी रस्ता खचत आहे अशा ठिकाणी थातूरमातूर दगड टाकून काम सुरू आहे त्यामुळे असे काम सुरू राहिल्यास काही महिन्यातच रोड खालील माती वाहून जाईल,
विद्युत खांब रस्त्यावरच
रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे बाजूला असलेले विद्युत खांब रस्त्यावरच आले असून रहदारीला मोठा प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे केव्हाही कधीही अपघात होऊ शकतो हे विद्युत खांब न काढता रोडचे काम सुरू आहे त्यामुळे हे काम उच्च दर्जाचे व्हावे उत्कृष्ट व्हावे तसेच रोडवर अंदाजपत्रकाचा फलक लावण्यात यावा या दृष्टिकोनातून काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग शिंगणे व शिवसेना नेते दामू अण्णा शिंगणे ,साहेबराव शिंगणे ,रवींद्र बोरकर प्रदीप फुटाणकर,राजेंद्र देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे ,,