सिंदखेड राजा/ प्रतिनिधी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 24- सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची आज दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी मा. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिंदखेड राजा प्रा.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.
आजच्या बैठकीमध्ये प्रा. खडसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या सर्व बाबींचा आढावा बैठकीमध्ये घेतला. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून, विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी मार्गदर्शन केले.
प्रा. खडसे यांनी आचारसंहितेचे पालन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, निवडणुकीतील कर्मचारी / अधिकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा सर्वांना आवाहन केले.
मतदान अर्ज भरण्यापासून ते मतदान मोजणी पर्यंत पोलीस विभागाची भूमिका ही खूप महत्वाची आणि जबाबदारीची असते याबद्दल सांगण्यात आले. नामनिर्देशन करतेवेळी, अर्ज माघे घेतेवेळी, सभा, मोर्चे, प्रचार करताना पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन प्रा. खडसे यांनी केले.
स्थिर सर्वेक्षण पथक (SST ) हे दिनांक 22 ऑक्टोबर पासून कार्यान्वित होणार असून 24 तास हे पथक काम करेल. गाडीची तपासणी करणे, संशयास्पद वस्तू आढळल्यास त्या जप्त करणे इत्यादी कामे हे पथक करत असते. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 4 फिरते पथक (FST ) स्थापन केले आहेत अशी माहिती प्रा. खडसे यांनी दिली.
बॅनर, झेंडे लावण्या संबंधिच्या परवानग्या आवश्यक असतील तसेच शस्त्र वापरासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या.
आजच्या या सभेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक देऊळगावराजा श्री. संतोष महल्ले, API सिंदखेडराजा श्री. तुषार जाधव, API किनगावराजा श्री. विनोद नरवाडे, API आंढेरा श्री विकास पाटील, PSI सिंदखेड राजा श्री. बालाजी सानप, PSI SDPO कार्यालय देऊळगाव राजा श्री. विश्वनाथ राठोड तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रसार माध्यम मध्ये अंकुश मस्के प्रकाश शिंदे व संजय सोनुने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.