बुलढाणा/ सचिन खंडारे ग्राहकांच्या हक्कासाठी सदैव लढण्याकरता तत्पर असलेल्या भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक समितीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी अखेर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेंद्र मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,तर सिंदखेडराजा तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,सदर दोघांनाही नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्षा डॉ सौ . आशाताई पाटील यांनी दिली आहे,
त्यामुळे ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांना न्याय देण्याकरता बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्राहकांची फौज उभी करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी सांगितले तसेच समितीमध्ये काम करण्याकरता तरुणांनी तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांनी सुद्धा सहभागी व्हावे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे ग्राहकांना न्याय देण्याकरता सदैव लढा उभा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले,
तसेच आपलं निवडे बद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा डॉ सौ आशाताई पाटील राज्य मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे यांचे आभार मानले आहे .