सिदखेडराजा/ प्रतिनिधी तालुक्यातील अंचली ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी संगणमत करून दलित वस्ती मधील व्यायाम शाळेचे पाच लाख रुपये काढून त्यामध्ये फक्त बेसमेंट केले त्यामुळे मागासवर्गीय वस्तीतील तरुणांना व्यायाम शाळेपासून वंचित ठेवले असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य प्रकास लिहिणार यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे याबाबतीत सविस्तर असे की
जिल्हा क्रीडा संचालनालय यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत मागास प्रवर्गातील तरुणाना गावातच व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळा असावी या हेतूने 7 लक्ष रू व्यायाम शाळा अनुदान दिल्या जाते यामधे अंचली ग्रामपंचायत ला 7 लक्ष रू प्राप्त झाले होते या मधे ग्रामपंचायत चे सरपंच व सचिव यांनी गावामधे व्यायाम शाळेचे फक्त बेसमेट केले आणि 5 लक्ष रू काढून घेतले मात्र अजूनही व्यायाम शाळा चे पुढील कामकाज करण्यात आले त्यामुळे ग्रामपंचायत चे सदस्य प्रकास लिहिणार यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिनांक 13/9/2024 रोजी निवेदन देवून त्वरित चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु पंचायत समिती प्रशासन यांनी आजपर्यंत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे संबधित दोषी वर कारवाई होवून मागास प्रवर्गातील वस्तीत त्वरित व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात येवून मागास प्रवर्गातील तरुणांसाठी व्यायामा ची सोय उपलब्ध होईल यांची दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे