राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्राची यशाची  परंपरा कायम

देऊळगाव राजा/ राजु भालेराव तब्बल 26 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाली आहे त्याचप्रमाणे ग्रामसेवक, आरोग्य सेविका ,तलाठी, शिक्षक, लिपिक या पदांवर सुद्धा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यावर्षीच्या भरतीत अशा सर्व विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 40 आहे.सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 2024 या वर्षी सचिन सांगळे या विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)म्हणून निवड झालेली आहे.तसेच अंजली हाटकर या विद्यार्थिनीची जालना जिल्हा पोलीस मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. बहुतांशी विद्यार्थी व विद्यार्थिनी या 18 ते 22 वर्ष या वयोगटातील आहे ही विशेष बाब आहे.

राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आतापर्यंत 700 पेक्षा अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झालेले आहेत. राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्र सौ. चंदाताई अनिलकुमार धारे यांच्या अथक परिश्रमाने अस्तित्वात आले असून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार या संस्थेच्या माध्यमातून मिळाला आहे. या संस्थेला नावारुपास आणण्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल कुमार तुळशीराम धारे (STI) यांचाही प्रमुख वाटा आहे.

2017 मध्ये सौ चंदाताई अनिलकुमार धारे यांनी ग्रामीण भागातील होतकरू आणि कष्टकरी विद्यार्थ्यांना कमीत कमी कालावधीमध्ये रोजगार मिळावा या सामाजिक बांधिलकीतून या संस्थेची सुरुवात केली आणि अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन, नोट्स वापरून, या संस्थेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन आपले जीवन यशस्वी केले आहे. या संस्थेची वाटचाल अशीच यशस्वीपणे होत राहावी अशी सदिच्छा राष्ट्रमाता परिवाराला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *