Buldhana news पिंपळ गाव लेंडी फाट्यावर अर्धवट जळलेला महिलेचा मृत देह आढळला

सिंदखेड राजा /प्रतिनिधी

https: //vruttamasternews.com/buldhana-news-14/

पडक्या धाब्या मागे आढळला अर्धवट जळलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह

परिसरात खळबळ; मृत महिला कुठली,मारेकरी कोण पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

 

सिंदखेडराजा/ प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव लेंडी फाट्यावर एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृत देह आढळून आला आहे.गुरुवारी दिनांक ३० मे रोजी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली या घटने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटना स्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी ७ वाजता प्रातरविधीसाठी गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली.भेदरलेल्या महिलेने परिसरातील अन्य लोकांना याची माहिती दिली,पोलिसांना कळविण्यात आले,त्यानंतर पोलिसांनी परिसर शिल करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला.सकाळी किनगाव राजा पोलिसांना या विषयी माहिती मिळाली स्थानिक पोलीस अधिकारी विनोद नरवडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सूचनेनुसार आपण घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.साधारण २० ते २५ वयोगटातील ही महिला असून तीला आधी ठार मारण्यात आले असावे व मध्यरात्री पासून पहाटेच्या दरम्यान तिचा मृतदेह सिंदखेडराजा,किनगाव राजा रस्त्यावरील एका पडक्या धाब्याचा मागे आणून टाकल्या नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृत महिलेच्या मानेवर मारल्याच्या खुणा असून पोटावर देखील जखम दिसून आली आहे.दरम्यान,महिलेच्या चेहऱ्यावर जळालेला कापड टाकण्यात आला आहे.तिच्या अंगावर काळ्या रंगाचा जळालेला परकर,अर्धवट जळालेला गावून होता तिच्या डाव्या पायाच्या पांजाची बोटे तुटलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.गळ्यात मंगळसूत्र किंवा अन्य काही नसल्याने सदर महिला अविवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.या घटनेचा तपास लागावा यासाठी परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व सीसी टिव्ही पोलिस तपासणार आहेत तर जवळच्या जिल्ह्यात महिला बेपत्ता असल्याचे प्रकरणाची माहिती घेतली जाणार आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी,उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास पोलिस उप निरीक्षक विनोद नरवडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *