सिंदखेडराजा चे उपविभागीय अधिकारी यांची दनके बाज कारवाई

देऊळगाव राजा/, प्रतिनिधी  दोन दिवसापूर्वी खडक पूर्णा प्रकल्पातील तीन बोटी महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तीन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या होत्या. तेच सातत्य राखत सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 18/9/2024 रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे अनुषंगाने मौजे दगडवाडी, मेहुनाराजा, बायगाव, चिंचखेड व सुलतानपूर या भागात शोध मोहीम राबविण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना मौजे मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरणा जवळ अवैध रेती उपसा करणारी एक बोट बाबत माहिती मिळताच, त्या बोटीवर कारवाई करण्यात आली. लगेच त्या फायबर बोट जिलेटिन च्या साह्याने नष्ट करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी आढळून आलेला जवळपास 25 ब्रास रेती चा साठा मौजे मेहुनाराजा येथील घरकुल लाभ धारकांना देण्यात आला. वाळू तस्करी करणाऱ्यांच्या बोटीवर धडक कारवाई होत असल्यामुळे अवैध रेती करणाऱ्यावर चाप बसेल.ही कारवाई करताना उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा.संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ ठाणेदार विकास पाटील, पोलीस स्टेशन अंढेरा, तलाठी तागवाले, देशपांडे, चिकटे, विलास नागरे, बुरकुल, खरात, तांबे, शिपाई अर्जुन सोनसळे, कोतवाल शरद काकडे, अश्विनी आंधळे, संदीप चेके, मारुती बंगाळे यांच्या समवेत करण्यात आली. यापुढेही अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटी व वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे सिंदखेड राजा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *