चिखली/ प्रतिनिधी परभणी येथील संविधानाची तोडफोड करणाऱ्या मनुवादी विचार सरणीच्या समाज कंटकाचा जाहिर निषेध….
आरोपीला कडक शासन झालेच पाहिजे..
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरल परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती
पुतळा असून पुतळ्या समोरच ब्रांझ धातूचे संविधान प्रत उभारली आहे,दिनांक १० डिसेंबर रोजी एका
मनुवादी विचारसरणीच्या समाजकंटकाने संविधानाची तोडफोड केली आहे..
संपूर्ण जगामध्ये भारतीय संविधानाचां गौरव होत असतांना परभणी येथे असे निच कृत्य करणाऱ्या
आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस कडक शिक्षा करावी
जेणेकरून असे कृत्य यापुढे कोणी करणार नाही..
नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी स्व:ता लक्ष घालून या समाजकंटकाला कडक
शासन करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तिकेची तोडफोड
करणाऱ्या माथेफिरू विरोधात मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत देशद्रोहाचा गुन्हा दाखल
करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे निवेदन परभणी येथील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान ची तोडफोड करणाऱ्या माथेफिरू विरोधात
चिखली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मुकतारखा पठाण सर जिल्हा कार्याध्यक्ष,
वंदनाताई वाघ जिल्हा अध्यक्ष महीला बुलढाणा
प्रकाष पाटिल , हिम्मतराव जाधव तालुका अध्यक्ष चिखली दिपक साळवे ,विशाल गवई, दादासाहेब जाधव, किरण ताई जाधव,उषा ताई इगळे , रुपाली काबळे सचिन बडगे, हारर्सिग छरे,सौ किरण जाधव समाधान भटकर
शेलेष गायकवड सजय वाकोडे फकिरा निकाळजे यांच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते