राजकारणातला बाप माणूस मा. श्री.माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब.

सिंदखेड राजा/ रामदास कहाळे

खोप्यात सुखाच्या जेव्हा रंगल्या लढयाच्या चर्चा

मी रस्त्यावर बंडाचा ध्वज उंच उभारत होतो

साळसुद्र सूर्याशी केले ना मी कधी तहनामे

मी लाख लाख लोकांच्या हृदयात प्रकशात

होतोसिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील कर्तृत्ववान, व कार्यशील माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब खऱ्या अर्थाने या मतदारसंघात आपण सहकार, व भगवान बाबा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचण्याचं ज्ञानदान सारखं पवित्र काम आपण केलं त्याचबरोबर आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात ,उद्योगधंदे, सहकार क्षेत्राच्या सहयोगाने इथल्या लोकांना रोजगार देण्याचं काम देखील आपण केलं आहे व कोणत्याही प्रकारचे मतभेद मनात न ठेवता आपण या मतदारसंघात माणूस पेरण्याचं काम केलं आहे आज ही आपण सतत आपल्या पायाला भिंगरी बांधून गावोगावी फिरत असतात त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी होऊन त्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम आपण करत आहात…हे आपल्यातील वेगळेपण आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपण हे सर्व करता तोतारामजी कायंदे साहेब म्हणजे एक संवेदनशील आणि कृतिशील नेतृत्व, सदैव सर्वांच्या सुख- दुःखा मध्ये सहभागी असणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. रुम्हण्या सारख्या छोट्याशा गावात सर्वसाधारण कुटुंबांमध्ये जन्मलेले कायंदे साहेब यांनी पुणे विद्यापीठातून एम ए मराठी केले, सिंदखेड राजा मतदार संघाचे दोन वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले, तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजाव कधीच दिसला नाही. खरंतर त्या वेळेला त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या आधारावर नोकरी सहज मिळाली असती, पण समाजसेवेचा ध्यास असणारे कायंदे साहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले. शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय हे जर समजून घ्यायचे असेल तर तोतारामजी कायंदे साहेबांचा जीवन प्रवास बघायला हवा. एकदा समाजाने ठरविल्यास अगदी सर्वसाधारण कुटुंबांमधील व्यक्तीला सुद्धा समाज एका उंचीवर नेऊन ठेवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कायंदे साहेब. तुमचा हेतू आणि कार्य चांगले असल्यास समाज तन-मन-धनाने तुमच्या पाठीशी उभा राहतो. कायंदे साहेबांनी समाजकारणांच्या व राजकारणांच्या पटलावार आपल्या कार्याचा ठसा जन माणसांत उमटवला आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना सुद्धा दोन वेळा सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून आमदार होणे तितकेसे सोपे नव्हते पण आपल्या जिवाभावाच्या माणसां सोबतचा असलेला मैत्रीचा गोतावळा व त्याचबरोबर सर्व समाजात असलेले त्यांचे कौटुंबिक संबंध आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क व बहुजनांच्या प्रती त्यांचा असलेला स्नेह हीच त्यांची जमेची बाजू राहिली आहे.

आजतागायत साहेबांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. मग ते संत चोखामेळा खडकपूर्णा धरणाची उभारणी असो किंवा जिजामाता सहकारी साखर कारखाना असो त्यांनी नेहमीच लोकांच्या भल्याचा विचार केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी योगदान दिले आहे. म्हणून आज समाज व मतदारसंघातील प्रत्येक जण आपल्या वारसंकडे भविष्याचं कृतिशील नेतृत्व तसेच या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचं आमदार म्हणून पाहत आहे…आणि याची दखल इथला मतदारराजा या होऊ घातलेल्या निवडणुकीत नक्कीच घेईल आणि हा राजकीय प्रवास पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्रच्या राजकारणात गती घेऊन विकासाची गंगा सर्व सामन्यांच्या दारा पर्यंत घेऊन जाईल यांत शंका नाही…आपलं भावी आयुष्य हे आनंदाचं व राजकीय पटलावर आपला राजकीय ठसा उमटवणारं ठरो ही वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *