मातृतिर्थ सिंदखेड राजा /प्रतिनिधी तालुक्यातील ग्राम सोनोशी येथील नालंदा बुध्द विहारास आंबेडकरी चळवळीचे नेते त्यागमृर्ती स्मृतीशेष नागोराव जाधव (गुरूजी) यांचे चिरंजीव रिपाई आठवले चे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विमल बाबासाहेब जाधव यांनी सोनोशी येथील नालंदा विहारास बुध्द वंदनेसाठी सतरंजी व बुध्द विहारास रेलींग करून दिली.
ज्या बुध्द विहारास स्वःताहाची जागा दिली व त्या ठीकाणी बुध्दविहार बांधले ते दानशूर जोडपे नारायण साहदु शिंदे व त्यांच्या पुर्णींगीनी कमल नारायण शिंदे या दानशुर जोडप्यांचा व त्यांच्या कार्याचा सत्कार व्हावा हा उद्देश समोर ठेवून बाबासाहेब जाधव व विमल बाबासाहेब जाधव यांनी ह्या दानशूर पती पत्नीचा शाल ड्रेस व साडी चोळी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला.
त्यावेळी सेवानिवृत्त पोलीस सबइन्सपेक्टर देविदास तूकाराम मांदळे, जयश्री देवीदास मांदळे यांनी त्यांच्या दानीवृतीचा पुष्प गुच्छ देवून सत्कार केला व पूढील त्यांच्या दानीवृत्तीस शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी ग्राम सोनोशी येथील उपासक उपासिका बहुसंखेने हजर होत्या.