सिंदखेडराजा (दि. २६ व २७ डिसेंबर): सर्वधर्मीय प्रतीक हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबांचा ४५ वा वार्षिक राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्मसमभाव सोहळा प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यर्थ येत्या गुरुवारी व शुक्रवारी साजरा होत आहे. या निमित्ताने हजरत दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था आणि असनाज हेल्थकेअर एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीर साठी महाराष्ट्रतील नामांकित रुग्णालय आणि नामवंत तज्ञ डॉक्टर आपली हजेरी लावणार आहे.
मोफत तपासणी शिबिराची वैशिष्ट्ये
1. सर्व प्रकारच्या कर्करोगाची तपासणी व मार्गदर्शन:
– तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, छातीचा, पोटाचा, हाडाचा व गर्भाशयाचा कॅन्सर यासह रक्तातील विविध कर्करोगांची मोफत तपासणी केली जाणार आहे.
2. विशेष तपासणी उपकरणे:
– मॅमोस्कॅन,प्याप स्मिर टेस्ट, कॉल्पोस्कोपी, दुर्बिणीद्वारे तोंडाची तपासणी.
3. नेत्ररोग तपासणी व उपचार:
– सर्व प्रकारच्या नेत्र विकारांची तपासणी व उपाययोजना.
4. मणक्यांच्या समस्यांवर तपासणी व मार्गदर्शन:
रुग्णांनी आपल्यासोबत मागील तपासणीचे कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
प्रमुख पाहुण्यांमध्ये सन्माननीय आयुष मंत्री श्री. प्रतापराव जाधव, मा. आमदार श्री. मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,मा. आमदार डॉ शशीकांत खेडेकर,श्री नारायण कुचे (आमदार बदनापूर), अँड नाझेर काझी (बुलढाणा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी) तसेच इतर मान्यवर नेत्यांचा सहभाग राहील.
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये इंडोनेशियाचे वाणिज्यदूत श्री. एडी वर्डोयो,यांना भारत गौरव अल्हज असद बाबा मेमोरियल इंटरनॅशनल पिस अवॉर्ड २०२४ जाहीर करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्यदूत श्री राजन कुमार ,, कोरियाचे वाणिज्यदूत श्री. सूं की पार्क, अमेरिका (भारत चॅप्टर) चे राजदूत श्री सोमशेखर,उपस्थित राहतील.
सर्वधर्मीय शाही चादर आणि पवित्र निशाण अनावरणसाठी धार्मिक व सामाजिक नेत्यांमध्ये स्वामी देवेंद्रजी महाराज (जैन साधक), मुफ्ती मंझुर झियाई (चीफ मुफ्ती ऑफ महाराष्ट्र),मौलाना डॉ. कल्बे रुशैद रिझवी (सचिव ओलेमा संसद दिल्ली, मौलाना अहमद नक्शबंदी (हैद्राबाद), भ्रिगु पीठाधिष्वर सुशील गोस्वामी महाराज (सचिव सर्व धर्म परिषद दिल्ली),आणि स्वामीनारायण संप्रदायातील महाव्रत स्वामी यांचा सहभाग राहील. आमंत्रित पाहुणे श्री गणपत कोठारी (अध्यक्ष कोठारी उद्योग समूह),श्री नुरोद्दीन सेववाला (क्राऊन फुड्स मुंबई, गोविंद यादव (सरिता ट्रॅव्हल्स मुंबई)
पुरस्कार वितरण समारंभ:
कार्यक्रमात भारत गौरवश्री अल्हाज असदबाबा मेमोरियल जीवन गौरव पुरस्कार २०२४, सेवा रत्न पुरस्कार , आणि विशेष वुमन आयकॉन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुकेश झवर (सी एम डी, बुलढाणा अर्बन)असून, डॉ. अमजद खान पठाण हे मुख्य संयोजक आहेत.
सज्जादा नशिन आयाजखान, सज्जादा नशिन अँड आरिफखान , अशपाक खान (उर्स कमिटी अध्यक्ष),व इतर समिती सदस्य डॉ दशरथ शिंदे ,नाजीम पठाण, शमशेर पठाण, जमिरुद्दिन कुरेशी,विजय कुमार दाड, सिध्दार्थ जाधव, डॉ शिवानंद जायभाये, डॉ विलास खुरपे,डॉ रत्नाकर किंगर,डॉ मुफिज खान यांनी सर्वांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे सादर आमंत्रण दिले आहे.
महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी दिल्या शुभेच्छा
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत्या 26 आणि 27 डिसेंबर गुरुवार आणि शुक्रवार रोजी होणाऱ्या 45 व्या राष्ट्रीय सर्वधर्मसमभाव कार्यक्रम साठी आणि भारत गौरव श्री अल्हाज असत बाबा यांच्या स्मृति पित्यार्थ आयोजित मोफत कर्करोग तपासणी आणि इतर रोग महाआरोग्य शिबिर हजरत गौस ए अजून दस्तगीर बाबा बहुउद्देशीय संस्था आणि असनज हेल्थकेअर एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे .मागील नऊ वर्षांमध्ये जवळपास 60000 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे यावर्षी जास्तीत जास्त रुग्णांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉक्टर अमजद खान पठाण कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई यांनी केलेले आहे या ऐतिहासिक समारोहासाठी आणि सर्व धर्मीय समभाव कार्यक्रमासाठी महामहिम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या पत्राद्वारे शुभेच्छा पाठविलेल्या असून भारत गौरव गुरुवर्य श्री अल्हाज असत बाबा यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे.तसेच डॉ अमजद पठाण यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे
या कार्यक्रमासाठी थायलंडचे वाणिज्य दुत तसेच मॉरिशियस, चिली , सल्तनत ऑफ ओमान ,आयर्लंड , दक्षिणआफ्रिका, दक्षिण कोरिया, कुवैत, सिंगापूर ,मलेशिया आणि रशिया येथील वाणिज्य दूतावास यांनी शुभेच्छापत्र पाठवून डॉक्टर पठाण यांचा गौरव केलेला आहे.