बुलढाणा/प्रतिनिधी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या कृती समितीच्या शेकडो अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यांनी कॉ. नंदकिशोर गायकवाड यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले,
यावेळी कॉ. नंदकिशोर गायकवाड म्हणाले की महाराष्ट्र शासनाने विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे भरघोस मानधन वाढ करून शासन निर्णय काढलेले आहेत परंतु कोरोना काळात आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ केलेली नाही ती मानधन वाढ शासनाने त्वरित करावी नाहीतर अंगणवाडी कर्मचारी कृती समिती येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढतील याची नोंद शासनाने घ्यावी, शासन एकीकडे नियमित काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी बालवाडी कर्मचारी ह्या शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करतात काम करतात परंतु त्यांना पुरेसे मानधन नसताना सुद्धा त्या सतत आपले काम करतात त्या सर्व महिला चिंताग्रस्त आहेत आणि त्यांनाना पगार वाढ व त्यांचा योग्य मोबदला देत नाही आणि एकीकडे शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून अनेक महिलांचा उद्धार करत असल्याच्या वावड्या उठवत आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे अतिरिक्त काम सुद्धा अंगणवाडी सेविका करत आहेत परंतु आधीच त्यांच्यावर विविध कामांचा भार आहे. म्हणून शासनाने तात्काळ मदत करावी तसेच मानधन वाढ ग्रॅज्युटी व दरमहा पेन्शन बाबत शासन लवकर निर्णय घेईल असे आश्वासन या अगोदर मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी दिलेले आहे. परंतु त्यावर अद्याप पर्यंत कोणताही निर्णय झाला नसून निवडणूक आचारसंहिता सुरू होण्याअगोदर या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशीही मागणी कॉम्रेड नंदकिशोर गायकवाड यांनी एका निवेदनद्वारे यावेळी केली निवेनावर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नंदकिशोर गायकवाड, दिलीप उटाणे ॲड.माधुरी क्षीरसागर वनिता कापसे,शोभा पुंड (भोकरे) सुरेखा तळेकर शशिकला मौर्य संगीता ठाकूर अलका राऊत शालिनी सरकटे तुळसाबाई भोपले रेखा मुंडे शिल्पा भोर शोभा पुंड यांच्यासह निवेदनावर शेकडो अंगणवाडी कर्मचारी बालवाडी युनियनच्या महिलांच्या सह्या आहेत.