बुलडाणा, (प्रतिनिधी )- भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेसचे नेते संसदेचे विरोधी पक्ष नेते राहूल गाधी यांच्या बद्दल वादग्रस्त बेताल वक्तव्य करणारे बुलडाणा विधान सभेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे वर बुलडाणा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे पण बलडाणा पोलीसांनी आद्याप पर्यंत त्यांना आटक केली नाही तर त्यांना त्वरित आटक करावी त्वरित आटक न केल्यास बुलडाणा जिल्ह्यात भिमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशार भिमशक्ती संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटनिस भाई कैलास सुखदाने यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदना व्दारे दिला.निवेदनावर भाई कैलास सुखदाने, विदर्भ सरचिटनिस किशोर दादा गवई, विदर्भ उपाध्यक्ष राजू पैठणे, सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष शरद इंगळे, मेहकर तालुका उपाध्यक्ष शरद इंगळे यांच्या सह्या आहे
