बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्याचे युवा नेते कुणाल पैठणकर यांच्या नेतृत्वात शंभर गावात होणार सविधानाचा जागर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या देशाला धर्मनिर्रपेक्ष, समता, संविधानानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहे.ही भारतीयांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.भारतीय संविधान आजही संपूर्ण देशाला एक संघ ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आपल्या देशाचा प्राण हा संविधान आहे. त्याचे रक्षण, जतन आणि त्या मार्गावर चालणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन संविधान जागृती रॅलीचे मुख्य आयोजक युवानेते कुणाल पैठणकर यांनी केले.
संविधान जागृती शंभर गावांमध्ये करण्यात येणार आहे. प्रबोधन सभेची सुरूवात १६ सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील मोंढाळा या गावापासून करण्यात आली. भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागृती रॅलीच्या माध्यमातून शंभर गावांमध्ये प्रबोधन सभेचे आयोजन केले आहे. या रॅलीचा प्रारंभ मोठ्या उत्साहात मोंढाळा या गावी करण्यात आला. या दिवसापासून पुढील शंभर दिवस संविधानाचा जागर या प्रबोधन सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सभेची सुरूवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने करण्यात आली. त्यानंतर आयोजन समितीचे प्रा. डी.आर. माळी, प्रा.राजेश खंडेराव, आत्माराम चौतमोल, यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व सांगून संविधान वाचवण्याची व तिच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची सर्वांना शपथ देण्यात आली. सुत्रसंचलन गौतम पानपाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी दशरथ खरात, वसंत खरात, कचरू खरात, दादाराव खरात, राजू खरात, प्रशांत खरात, अमोल खरात, चिरंजीव खरात, सोनु खरात, आशा खरात, सुनिता पानपाटील, चंद्रभागा खरात, भाग्यलता खरात, शांताबाई खरात, मंगला खरात, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बउत्साहात प्रारंभ…
तिसरी प्रबोधन सभा संपन्न
संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागृती रॅली च्या माध्यमातून100 गावांमध्ये प्रबोधन सभा आयोजित करण्यात आले आहे. या रॅलीची प्रबोधन सभा आज दि.18 सप्टेंबर 2024 रोजी ढालसावंगी जिल्हा बुलढाणा या गावी संपन्न झाली.
या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने ग्रामवासी व बहुजन बांधव सहभागी झाले होते.
यावेळी प्रा. राजेश खंडेराव प्रा. सचिन खरे व संविधान जागृती रॅलीचे आयोजक कुणाल पैठणकर यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव हिवाळे सर यांनी केले. कार्यक्रमाला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते