बुलढाणा /सिद्धार्थ पैठणे दि.२० सप्टेंबर रोजी चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील सी.आर.पी.एफ जवान विजय जाधव यांचे नागपुर येथे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने दुःखद निधन झाले.
विजय जाधव हे नागपुर येथे कर्तव्यावर असतांना त्यांना अचानक मेंदूचा त्रास जाणवत असल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले,पंधरा दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यास अपयश आले,
विजय जाधव यांचा जन्म शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर १९ फेब्रुवारी १९८५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मकरध्वज खंडाळा या गावी झाला होता त्यांचं प्रार्थमिक शिक्षण ७ वी पर्यंत गावीच झालं व पुढील शिक्षणासाठी चिखली येथील शिवाजी विद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले व त्यांनी एन सी सी चे केअर टेकर अंडर ऑफिसर म्हणून काम केले त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र जाधव हे आर्मित असल्याने त्यांची लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची त्यांची ईच्छा होती, त्यामुळे ते २००६ मध्ये सी आर पी एफ मध्ये भरती देखील झाले,
जाधव हे मिझोरम, निमाचछ, छतीसगड व गडचिरोली या ठिकाणी खूपिया विभागात त्यांनी काम केले , गडचिरोली येथे कर्तव्यावर असतांना त्यांनी एक नक्षलवादी महिला व चार नक्षली पुरूष यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त देखील केले व त्यांचे आत्मसमर्पण मोहीम पूर्णत्वास नेत असतांना नक्षल्यांशी चकमक झाली व त्यात एक गोळी त्यांच्या खंद्याला चाटून गेली त्यात त्यांचे थोडक्यात प्राण वाचले होते असे अनेक महत्वपूर्ण मोहीमेत त्यांनी सहभाग नोंदवला असल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कौतूक देखील केले, भारत मातेची सेवा करत असतांना काळ्या आईशी देखील त्यांचा लळा असल्याने त्यांचे साडभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या माध्यमातून ते नेहमीच देशसेवेसह शेतकरी हितासाठी देखील लढा देत असत त्यांच्या पश्यात भाऊ,पत्नी सौ.कांचन,मुल विहान व श्रेयान तसेच खूप मोठा आप्त परिवार अकाली निधन मृत्यूने दुःखाच्या खाईत लोटला गेला असून उद्या दि.२२ सप्टेंबर रोजी त्यांचे अंत्य दर्शन चिखली येथील त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र जाधव यांच्या घरी सकाळी ६ ते ८:३० पर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर चिखली येथे व त्यानंतर त्यांच्या मूळ गावी खंडाळा मकरध्वज येथे त्यांना सकाळी १०:०० वाजता शासकीय इतमामात मानवंदना दिली जाईल.