सिंदखेड राजा/ प्रतिनिधी प्रत सिंदखेड राजा नगरीतील ज्या नवदांपत्याने स्वतःचे लग्न डिजे संस्कृती टाळून सत्यशोधक पध्दतीने केले अशा श्री.सागर ए.मेहेत्रे व सौ.संध्या सागर मेहेत्रे यांच्या हस्ते *सत्यशोधक समाज ध्वजाचे ध्वजारोहण* करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रसंगी मान्यवरांनी प्रथम महात्मा जोतीराव फुले,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले व आपले विचार व्यक्त केले.
पुरोहिताला लग्नाला बोलवा न बोलवा,दक्षिणा मात्र द्या – पुणे न्यायालय
*महात्मा जोतिराव फुले आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.*
ही आधुनिक भारतातली ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली पहिली सामाजिक, शैक्षणिक चळवळ होती. *”सर्वसाक्षी जगत्पती,नकोच त्याला मध्यस्थी!”* हे या समाजाचे ब्रीद वाक्य होते.निर्मिक आणि माणूस यांच्यामध्ये दलाल किंवा मध्यस्थ नको हे मुख्य सूत्र होते.
सत्यशोधक समाजात कबीरांचे दोहे म्हटले जात असे.त्यांच्या बीजक या क्रांतिकारी ग्रंथातला सत्यशोधक प्रमाण विचार मानित असत. संत तुकाराम आणि वारकरी समाज हा या संघटनेचा कणा होता.स्थापनेनंतर अवघ्या तीन महिन्यात पुण्यात सत्यशोधक पद्धतीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. बायकांचे अधिकार स्थापन करण्याची प्रतिज्ञा या लग्नात वधूवर घेत असत.कमी खर्चात,साध्या पद्धतीने आणि हुंडा न देता घेता ही लग्नं होत. भटजीला न बोलावता नातेवाईक व मित्र हे लग्न लावत असत. २५ डिसेंबर १८७३ ला पहिलं सत्यशोधक लग्न लागलं. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रसंगी माजी प.स.सभापती लखुजीराव जाधव यांचे वंशज श्री.शिवाजीराजे जाधव,श्री.देविदासराव ठाकरे, श्री.त्र्यबंकराव ठाकरे,श्री.एकनाथराव मेहेत्रे,श्री.रामराव आढाव,श्री.नरहरी तायडे, श्री.योगेश म्हस्के,श्री.कैलास मेहेत्रे,श्री.भाऊराव ठाकरे, श्री.अर्जून ठाकरे, सौ.सुशिला आढाव,सौ.रमाताई मेहेत्रे,सौ.अनिता मेहेत्रे,श्री.संजय ठाकरे ,श्री.प्रकाश आढाव ,श्री.सिध्दार्थ म्हस्के,मौर्य आकाश मेहेत्रे,श्री.दत्ता खरात ,श्री.तुकाराम माने , डॉ.भिमराव मस्के ,श्री.गोपीचंद खुरपे ,श्री रंगनाथ मेहेत्रे ,श्री.खांडेभराड महाराज, श्री.नंदू कुरंगळ,श्री.सुधाकर चौधरी,श्री.दिलीप चौधरी,श्री अनिल मेहेत्रे,श्री.राजेंद्र आढाव पत्रकार श्री.गजानन मेहेत्रे, पत्रकार श्री.छगन झोरे,श्री.किशोर जाधव व
महाराष्ट्र माळी कर्मचारी संघटना,राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा,बामसेफ, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ बुलढाणा यांचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्यासाठी सत्यशोधक समाज समिती सिंदखेड राजा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.