देऊळगाव राजा /प्रतीनिधी राजु भालेराव जिल्हा परिषद महिला परिचर गेल्या अनेक वर्षा पासून अंत्यंत अल्प मानधनावर काम करत आहेत त्यांच्या मागण्या रितसर आहे तरि शासनाने या महिला परिचर यांच्या मागण्यावर लक्ष केंद्रीत करून न्याय देण्यात यावा आपल्याकडे कालावधी फार कमी असल्यामुळे शासन प्रस्ताव मान्य न केल्यामुळे राज्य कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि मंत्रालय ते आरोग्य भवन ते सर्वजनिक आरोग्य विभाग येथे चौकशी केली असता प्रस्ताव पाठवलेला नाही करिता आम्ही भेटी घेऊन चर्चा केल्या. चर्चेनंतरअव्वर सचिव व सह सचिव यांना नियमाने चर्चा केली असता लगेच दि. 24/7/2024 रोजी लगेच इतर विभागाची माहिती मागविन्या साठी अंतिम पत्र आमच्य्यासमोर पाठविण्यात आले. व मा सह सचिव व मा अव्वर सचिव यांनी संघटनेला 8 दिवसाची वेळ मागितली आहे.आपण वेळ तर दिलीच परंतु. विभागाने संघटनेला विनंती केली की तुम्ही काम बंद आंदोलन करू नका. तरी सुद्धा संघटनेला मान्य नाही. करीता ताबडतोब निर्णय घेऊन बेमदत काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच 1 तारखे पर्यंत प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाही तर संप मागे घेण्यात येईल अन्यथा काम बंद आंदोलन सुरू.करूू असे निदर्शनात आले की. आपल्या संघटना 4 ते 5 झालेल्या आहेत. आणि मागण्या वेगवेगळ्या पद्धतीचे व माहिती जात असल्यामुळे. आपल्या कामात व्यत्यय निर्माण झालेला आहे करीता आपण एक जूट होऊन महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन करण्याचा कारण हे तुम्हाला नंतर निदर्शनास येईल.सर्वच संघटना मी मी करीत आहेत. पण फक्त आपली मागणी होणे आवश्यक आहे याकरिता पूर्णपणे संघटना शक्ती लावून काम करीत आहे. आज तुमच्या मदतीची संघटनेला गरज आहे. सर्वांनी सहकार्य करून कोणी कामावर न जाता आपण आपल्या घरी राहून काम बंद आंदोलन यशस्वी कराव. आपल्या मनात अनेक विचार येत असतील. आणि येतात सहाजिक आहे परंतु सरकारने सुद्धा आपल्या अनेक संघटनासाठी वेगळे वेगळे विचार करीत आहे. त्या मुळे आपण विचलित न होता कोणीही कामावर न जाता कोणी दबावात न येता. कोणत्याही अधिकाऱ्याच्या धमकीला न घाबरता आपण कामावर कोणी जाऊ नये. त्या साठी संघटना पूर्ण शक्तीने आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. भगिनींनो सर्वांनाच पगारवाढीची गरज आहे. आणि जर आत्ता पगार वाढ झाली नाही तर परत पाच वर्ष आपल्याला थांबावं लागेल. संप यशस्वी करा. तशी तुम्हाला 8 दिवसात सूचना आली तर कळविण्यात येईलच. तरी कोणतही किंतु परंतु मना मध्ये न ठेवता. प्रश्न उत्तर न करता. आपण सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती आहे. त्याच प्रमाणे आपणास जिल्हास्तरावर निवेदन पाठवलेला आहे तो प्रत्येकाने जिल्हा परिषदेला सीईओ ला व डी एच ओ ला निवेदन द्यावे ही जबाबदारी जिल्हा अध्यक्ष सचिव यांनी घ्यावी. असे आवाहन
राज्य सरचिटणीस मंजुळा बांगर. अकोला
राज्य कोषाध्यक्ष सविता हटवार भंडारा.
राज्य कार्याध्यक्ष सुनीता सावंत सांगली.
राज्य अध्यक्ष मंगला मेश्राम नागपूर.. व सर्व पदाधिकारी मंडळ.