चिखली/ प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रभारी व निरीक्षक अंबादास घेवंदे जिल्हा अध्यक्ष शंकर मलवार यांच्या उपस्थिती मध्ये असख्यं महीला व पुरुषांचा पक्षप्रवेश जयस्तभं चौक वाटीका चिखली येथे सपंनऩ झाला.
यावेळी तालुकाध्यक्षपदी सतीश पंडागळे, युवा तालुका अध्यक्षपदी सुनील साळवे महीला तालुका अध्यक्षपदी शकूंतला राउत, चिखली शहराध्यक्षपदी संघर्ष तरकसे , युवा तालुका उपाध्यक्षपदी योगेश खरात, युवा तालुका सचिव विनोद जाधव, यांची नियुक्ती करण्यात आली .यावेळी अनिल धोडे,शूभम जाधव,अजय खरात,अनिल जाधव, आकाश बोरकर,नितिन साळवे,दिपक साबळे, गणेश बोर्डे, नागेश साळवे, श्रावण शिंगणे, मीना घेवंदे ,सुनीता अंभोरे ,सोनाली अंभोरे ,नंदा अंभोरे यासह अनेकांची उपस्थिती होती.