बुलढाणा /प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा जवळील शिंदी येथील पत्रकार सचिन मधुकर खंडारे यांना जळगाव खान्देश जिल्ह्यातील भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचा मानाचा उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे,सदर अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ जयश्रीताई इंगळे यांनी सदर पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र दिनांक २९ सप्टेंबर रोजी दिले आहे,त्यामुळे एका वर्षामध्ये पत्रकार सचिन खंडारे यांना मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे,सचिन खंडारे हे गेल्या बारा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उत्कृष्टरित्या काम करीत आहे,शेती,विद्यार्थी,पालक,,
गाव पातळीवरील रस्त्याच्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या नागरिकांच्या समस्या तहसील दवाखाना यांच्या समस्या त्या सर्व समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून सचिन खंडारे सातत्याने मांडत असतं, त्यामुळे अनेकांचा रोष सुद्धा त्यांनी पत्करला आहे ,या सर्वांची तमा बळकता त्यांचे लेखणीचे काम सुरूच आहे,लेखणी बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असतात यामध्ये रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तालुक्यातील जनुना तांडा येथे वंचित दीनदुबळ्या महिलांना दरवर्षी ते पन्नास साड्याचे वाटप करत असतात .दिवाळीला गरिबांना किराणा किट वाटप करत असतात,रक्तदान शिबिरे,विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार अनेक सामाजिक कार्यक्रम ते घेत असतात, आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे, नोव्हेंबर मध्ये सदर भुसावळ येथील शानदार कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे,त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,