देऊळगाव राजा- देऊळगाव राजा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे युवा नेते संतोष कदम यांची राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया १९५६ च्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन त्यांना जिल्हा प्रभारी अंबादास घेवंदे व जिल्हा अध्यक्ष शंकर मलवार यांच्या हस्ते देऊळगाव राजा येथे नियुक्ती पञ देण्यात आले.
संतोष कदम हे गेल्या २० वर्षापासुन आंबेडकरी चळवळीत काम करत असुन या आधीही त्यांनी विविध पक्षांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे.चळवळीत व राजकीय पक्षांत अनेक वर्षे सक्रिय काम केले असल्याने संतोष कदम यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले असुन त्यांच्या या प्रवेशामुळे देऊळगाव राजा तालुक्यात रिपाईला बळकटी मिळणार असुन त्यांच्या या निर्णयाचे तालुकाभरातुन स्वागत होत असुन अनेक समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राजरत्न आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक व कौटुंबिक वारसा चालवत असुन ते रिपब्लिकन पक्षाची धुरा हाती घेऊन समाजाला सत्ता मिळवुन देण्याचे काम करत असल्यानेच आपण या पक्षात प्रवेश करत असल्याचे संतोष कदम यांनी सांगितले तसेच आपल्याला असलेल्या राजकीय सामाजिक अनुभवामुळे देऊळगाव राजा तालुक्यात रिपब्लिकन पार्टीचे संघटन मजबुत करुन जनतेच्या,गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोनेरी दिवस आणण्यासाठी जिवाची बाजी लावुन काम करु व समाजाला सत्तेत बसवु अशी प्रतिक्रीया यावेळी संतोष कदम यांनी दिली.
तसेच राजरत्न आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सक्षमपणे चालवित असल्याने समाजाने राजरत्न आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन यावेळी संतोष कदम यांनी केले.