सिंदखेड राजा /प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव राजा येथे गावांमध्ये देशी-विदेशी आणि हातभट्टी दारू विक्री होत आहे त्यामुळे गावांमध्ये या अवैध दारूमुळे प्रत्येक कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला असून तरुण मुले सुद्धा व्यसनाच्या आहारी जात आहेत कुटुंबांमध्ये दारू पिऊन भांडणे होत आहेत त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री तात्काळ थांबण्यात यावी याबाबत आडगाव राजा ग्रामपंचायत ने ग्रामसभा घेऊन अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी ठराव सुद्धा घेण्यात आला आहे गावामधे अवैध दारू विक्री मुळे कुटुंबामध्ये झगडे चालू आहेत यामुळे सदर दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या कडे निवेदन देण्यात आले असून त्याचबरोबर ठाणेदार ब्रह्मदेव शेळके याना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे आडगाव राजा येथील दारू बंद न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा महिलांनी निर्धार केला आहे निवेदनावर कमलबाई कारभारी शिंनगारे, संगीता विठ्ठल काळे सौ.नंदा विजय सोनुने, सौ अलका विनोद सोनुने, सौ गोदावरी किशोर शिंदे सौ अनिता शिवाजी धोत्रे, नंदा बाळू कसबे,सौ उज्वला विष्णू फुले ,सौ संगीता विष्णू खंडारे, सौ वनिता गजानन फुले,सौ सुनीता शिवाजी भालेराव ,सौ शोभा भगवान कहाळे, सौ सिंधुबाई रमेश शिंदे सौ चंद्रभागा रामदास कहाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत
