सिंदखेडराजा / प्रतिनिधी दि ५ ऑक्टोबर २४अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला…! सुशिक्षित बेरोजगार होतकरू तरुणांनी उद्योगधंदे व्यवसायाकडे वळावं म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांचे समाजकारणातून अर्थकारणाकडे या “बिझनेस कॉन्फरन्सचे” आयोजन पंचायत समिती सभागृहात दि ५ रोजी दुपारी 2 वाजता संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी केले होते यावेळी गायकवाड बोलताना म्हणाले कि विचार बदला तरच कृती बदलेल अर्थकारण प्रबळ असल्याशिवाय कुटुंब देश प्रबळ आसू शकत नाही यावेळी त्यांचे विचाराने उपस्थितांना प्रेरित केले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांनी बहुजन समाजातील तरुणांनी बिजनेस कडे वळावं उद्योगाकडे वळावं यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात “बिजनेस कॉन्फरन्स” चे आयोजन केले होते या कार्यक्रमात विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जिजाऊ फिल्म सिटीचे निर्मिता सुनील शेळके यांनी सत्यशोधक, महापरिनिर्वाण असे बहुजन समाज सुधारकांचे चित्रपट निर्मिती करून महामानवांच्या विचाराची जनजागृती करण्याचं काम केल्याबद्दल सुनील शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ शाहू फुले आंबेडकर यांचे विचार शाहिरी पोवाड्यातून समाज प्रबोधन करणारे शाहीर रामदासजी कुरंगळ यांचा देखील या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला या ठिकाणी ग्रामीण भागातील युवक यांनी दिल्लीत जाऊन मोठे उद्योगधंदे निर्माण केले त्याबद्दल संदीप राजे जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आला यावेळी पुढे बालताना ते म्हणाले कि इतिहासात फार रमलो नंतर समजले कि इतिहाचा वापर मत विभाजनासाठी केला जातो आम्ही महापुरुचा आदरच करतो शहाजी राजे सुद्धा अर्थकारणी होते जिजाऊने सुद्धा अर्थकारण चालूऊन आग्रा येथे पैसे पाठवले होते महात्मा फुले सुद्धा मोठे कॉन्ट्रॅक्टर होते हे लक्षात घेतले पाहिजे परंतु राजकारणी आपल्या सोईनुसार महापुरुषाचा सोयीचा इतिहास सांगतात प्रसार माध्यमावर सकाळी येऊन राजकीय प्रवक्ते मानसिक स्वस्त बिघडवितात, जगात चायना लोकसखेचे बाबतीत १ नंबर होता आज भारत लोकसंख्येचे बाबतीत १ नंबर आहे तर चायना अर्थ व्यवस्तते १ नंबर आहे आम्ही जाती जाती मध्ये अडकलो संभाजी ब्रिगेडने ठरवले कि अर्थ कारण महत्वचे आहे आपले मुले विदेशात पाठवा मिळेल तो व्यवसाय करा शासकीय योजना म्हणजे मलमपट्टी आहे मोठं मोठे उधोग उभे राहिले पाहिजे या वेळी उदोग व्यवसाय जगातील संधी आणि आव्हान यावर तयानी मार्गदर्शन केले यावेळी शिवाजी राजे,शिवाजी गव्हाड, वैभव सुर्वे, आत्माराम शिंदे,अजय भोसले , सुधीरजी भोसले, सह मान्यवर उपस्तित होते सूत्र संचलन प्रवीण गीते यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड संदीप मेहेत्रे यांनी केले