समृद्धी महामार्गावर धावत्या वाहानावर दगड मारून काचा फोडल्या वाहान चालकासह तीन जखमी

दुसरबीड / सुरज कुटे दिनांक ८समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस रात्री अप रात्री चालणाऱ्या वाहनावर ब्रिजवरून दगड मारणे अथवा वाटेत दगड टाकून अडवण्याच्या घटना मध्ये वाढ होत आहे अशीच एक घटना काल

रात्री अकरा वा. दरम्यान चायनैज नंबर 307.1 घडली

जवळील देऊळगाव कोळ ते बीबी कडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिज पुलावरून समृद्धि महामार्गने जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 29 BE 6777 अज्ञात इसमांनी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलचा समोरील काच फुटून यामध्ये चालक रुपेश माधव रुडे रा. मांडवा ता डिग्रस व प्रवासी राजेंद्र राठोड वय 43 रा. महाळुंगी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ व अनिल गवई रा.सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले.चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले सदरची माहिती प्राप्त होताच तात्काळ महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान श्रावण घट्टे ,नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींवर समृद्धी महामार्ग वरील ॲम्बुलन्स चे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले तसेच पोलीस स्टेशन बीबी चे ठाणेदार संदीप पाटील ,पोलीस अमलदार अरुण सानप ,चव्हाण, भगवान नागरे व इतर स्टाफ नी सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हे मिळून आले नाही. सदर ट्रॅव्हलचालक नी प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली .जर चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात घडला असता. समृद्धी महामार्गावर महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर, श्री यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस चे दोन वाहने सतत नाईट पेट्रोलिंग करीत असतात . पोलिसाची नजर चुकून सदर घटना घडत आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन बीबी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *