शेगाव/देवचंद समदूर अतिशय हालाखीच्या गरीब परिस्थितीतून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन विशाल अरुण समदूर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून त्याचे कर सहाय्यक tax assistance व महसूल सहाय्यक mpsc clark या दोन पोस्टवर त्याची निवड झाल्याने शेगाव शहरासह गाव गोळेगाव बुद्रुक येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
विशाल एसटी बसणे घरी येत असताना त्याच्या स्वागतासाठी भोनगाव फाटा येथे गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती यावेळी विशाल बस मधून उतरता क्षणी त्याच्यावर जेसीबी च्या साह्याने फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.
नंतर विशालला पुष्पमाला अर्पण करू त्याला ढोल ताशांच्या गजरात गाव गोळेगाव बुद्रुक येथे आणण्यात आले तसेच गावात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर त्याचे गावांमधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व सामाजिक स्तरावरून विशाल चे कौतुक करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विशालच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने त्यांनी आर्थिक परिस्थितीची परवा न करता गावभर पेढे वाटप केले विशालच्या मिरवणूक मध्ये त्याच्या हातात संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढली.
गरीब कुटुंबातील विशालच्या आई-वडिलांचे विशालच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम व विशालने केलेल्या जिद्द व चिकाटीचा अभ्यास यामुळे आज विशाल सरकारी नोकरीवर लागलेला आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा परिवार आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे
विशालने आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेला देऊन आपल्या अशिक्षित आई-वडिलांच्या परिश्रमाला आणि त्यांनी दिलेल्या धैर्याला दिले आहे
आर्थिक परिस्थिती नसतानाही मी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अर्धा फोटो उपाशी राहून रात्रंदिवस अभ्यास केला आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात इतर कुठलेही गोष्टीकडे लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष दिले तर यश संपादन करणे कठीण नाही
विशाल अरुण समदूर