buldhana news स्व. गोपीनाथजी मुंढेंच्या १०व्या पुण्यतिथीनिमित.. बुलढाण्यात कृष्णा पाटील व बळीराम गितेंचे व्याख्यान

https://vruttamasternews.com/buldhana-news-17/

स्व. गोपीनाथजी मुंढेंच्या १०व्या पुण्यतिथीनिमित..
बुलढाण्यात कृष्णा पाटील व बळीराम गितेंचे व्याख्यान!

बुलडाणा:
बहुजन समाजाचे भाग्यविधाते तथा भारतीय जनता पार्टीचे नेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांची दहावी पुण्यतिथी सोमवार ३ जून रोजी असून, त्यानिमित्त विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद शाखा बुलढाणाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले गेले असून.. यात राष्ट्रीय युवा व्याख्याते प्रा. कृष्णा पाटील तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बळीराम गीते या दोन विचारवंतांच्या व्याख्यानाचे आयोजन केल्या गेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाघ हे राहणार आहेत.

स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे व्यक्तित्व कर्तृत्व व नेतृत्व सर्वव्यापी होते. ऊसतोड कामगार ते केंद्रीय मंत्री, असा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला व भारलेला असून.. त्यांच्या जीवनातील विविध पैलू समाजापुढे येण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, बुलढाणा येथे विदर्भ वंजारी समाज सेवा परीक्षेच्या वतीने राष्ट्रीय युवा व्याख्याते प्रा. कृष्णा पाटील व निरूपणकार बळीराम गीते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय धाड रोड, बुलढाणा येथे होणाऱ्या या व्याख्यान कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वंजारी समाज बुलढाणा व चिखली तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *