सिंदखेड राजा / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोळी म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थळावर महाराष्ट्रातील उमेद संघटनेच्या हजारो महिलानी गजबजले मातृतीर्थ शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून अस्थापणेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याकरिता सर्व महाराष्ट्रभर उमेद अभियानाचे आंदोलन सुरू आहेत. उमेद कर्मचारी व उमेद महिला संघटना यांच्या वतीने असंख्य महिलांच्या उपस्थितीत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राज्यस्तरीय पहिले एकदिवसीय अधिवेशन आज दिनांक 09 ऑक्टोबर 2024 ला पार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाखों महिला कॅडर व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले. संघटनेच्या प्रमुख मागण्यां खालील प्रमाणे आहेत.
1. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता.
2. सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन कायम स्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे.
3. उमेद अभियानातील सर्व केडर यांना आशा सेविका व अंगणवाडी सेविका प्रमाणे ग्रामस्तरावर स्वतंत्र केडर म्हणून मान्यता देणे.
4. सर्व समुदाय स्तरीय संस्थांच्या सदस्यांना संघटनेचे सभासदत्व देऊन त्यांची संघटन बांधणी करणे.
5. उमेद अभियानातील कंत्राटीकरण बंद व्हावे, त्रयस्त संस्थेचे धोरण अभियानाला लागू करन्यात येऊ नये. सदरील भरती तात्काळ बंद करण्यात यावी.
6. उमेद अभियानातील समुदायस्तरीय संस्था प्रतिनिधी उमेद संघटनेचे सदस्य यांना पंचायत राज संस्था मध्ये उमेदवार म्हणून निवाडीस मान्यता घेणे.
मुख्यमंत्री महोदय व मा. मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांचेसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत असे आश्वासित केले होते. दिनांक १० ते १२ जुलै रोजीच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान प्राप्त झालेल्या पत्रान्वये अध्याप मागण्या पूर्ण न झालेमुळे अभियानातील सर्व महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा. ग्रामविकास मंत्री महोदय यांचा मान राखून आझाद मैदानातील आंदोलन दिनांक १२ जुलै २०२४ रोजी तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मा.मुख्यमंत्री, मा. ग्राम विकास मंत्री व मा. प्रधान सचिव महोदय यांचेसोबत संघटनेच्या प्रलंबित न्याय मागन्यांच्या पूर्ततेबाबतची प्रक्रिया जाणून घेनेसाठी प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मिळावा यासाठी वेळोवेळी विनंती करण्यात आलेली होती. मात्र आम्हाला शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभियानात सहभागी झालेल्या ७४ लक्ष कुटुंबांच्या वतीने तूर्त स्थगित केलेले बेमुदत धरणे आंदोलन गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुरू कण्यात आले आहे. दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी पासून संविधानिक मार्गाने संप सुरु करण्यात आला असून कामबंद आंदोलन, गाव स्तरावर मशाल/प्रभात फेरी सुरु कण्यात आल्या आहेत. परंतु शासनाने अद्याप कुठल्याही पद्धतीची दाखल घेतलेली नसल्याने आज उमेद कर्मचारी व उमेद महिला संघटना यांच्या वतीने असंख्य महिलांच्या उपस्थितीत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राज्यस्तरीय पहिले एकदिवसीय अधिवेशन आज दिनांक 09 ऑक्टोबर 2024 ला पार पडले. आजच्या अधिवेशन वेळी अंजली ताई आंबेडकर, शशिकांत खेडेकर मा आमदार, चंद्रकांत दानवे मा आमदार, तोताराम कायंदे मा आमदार, सिद्धार्थ जाधव शहर अध्यक्ष काँग्रेस यांनी अधिवेशन स्थळी भेट दिली.
सदर कार्यक्रमाला स्वप्नील शिर्के राज्य अध्यक्ष उमेद कर्मचारी संघटना, रुपाली नाकाडे राज्य अध्यक्ष महिला कार्यकारिनी, निर्मला शेलार, रुपेश मर्चंन्ट, नवनाथ पवार, बाबासाहेब सरोदे, संदीप दाभाडे, श्याम खोंड, विक्रांत जाधव, विजय चव्हाण, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कर्मचारी व कॅडर लाखोंच्या संख्येत आज अधिवेशनात उपस्थित होते
एवढ्या मोठ्या भव्य राज्य स्तरीयअधिवेशन ची 2 दिवसात शिस्तबध्द नियोजन ची जबाबदारी भूमिपुत्र विक्रांत महेशराव जाधव (जिल्हा व्यवसथापक उमेद अभियान)यांनी यशस्वी रित्या पार पाडली
].