सिंदखेडराजा/ प्रतिनिधी महावाचन उत्सव 2024 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, अंचली शाळेच्या इयत्ता 3 री ते 8वी च्या 100% विदयार्थ्यांनी सहभाग घेत सिंदखेड राजा तालुकास्तरीय इयत्ता 3 री ते 5 वीच्या गट अ मधून प्रथम क्रमांक :-इयत्ता 5 वीच्या कु जानव्ही सिद्धेश्वर भानुसे हीने पटकवला तर इयत्ता 6 वी ते 8 वी च्या गट ब मधून प्रथम क्रमांक इयत्ता 8 वीच्या कु श्रेया राजू सोळंके हीने तर याच गटातील तिसरा क्रमांक इयत्ता 6 वी च्या ईश्वर अरुण कोळी याने मिळवत तालुक्यावरील तीन पारितोषिके तर जिल्हास्तरावरील गट ब मधून कु श्रेया राजू सोळंके ने तिसरा क्रमांक मिळवत, आपल्या पंचायत समिती आणि तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर चमकवले! विशेष म्हणजे आयोजकांनी श्रेया सोळंके या एकमेव विदयार्थीनीला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन मातृतीर्थाचा गौरव केला! बुलडाणा येथे श्री शिवाजी विद्यालयात संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात साहेब, शिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात व श्री अकाळ , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ भटकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले
जिल्हास्तरावर अंचली शाळेला चार चार पारितोषिके मिळवल्याबाबत विद्यार्थी व टीम अंचालीवर वरिष्ठाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे!
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना साहित्यिक व कवी विनोद ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचे आभार व्यक्त करतांना लहान वयात मुलांची पुस्तकाशी मैत्री होण्याच्या दृष्ठिने आणि समृद्ध वाचन चळवळ गतिमान होण्यासाठी राबविलेल्या महावाचन उत्सवाचा प्रभावी परिणाम होत असून यामुळे शालेय मुले नक्की वाचनाकडे आकर्षित होत असल्याचे मत व्यक्त करत पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थी, शिक्षक व शाळेच्या वतीने श्री खेडेकर, थोरवे सर, ठाकरे सर, म्हस्के सर, बोडखे सर व कु जंघाळे मॅडम यांनी आभार व्यक्त केले,