बुलडाणा,(प्रतिनिधी)- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आक्टोंबर १९५६ साली हिंदु धर्माचा त्याग करून “ बुध्द आणि त्याचा धम्म “ हा पवित्र धम्म ग्रंथ स्वत: लिहून नव कोटी समाजाच्या स्वाधीन केला तो पवित्र धर्म ग्रंथ बुध्द अनुयायी उपासिक उपासिका आपल्या घरा घरा मध्ये या बुध्द विहारात दरवर्षी सामुहिक वर्षावासात करीत तीन महीने या पवित्र धर्म ग्रंथांचे वाचन करून आत्मसात करीत असतात व तीन महीने झाले की, त्या ग्रंथांची समापती असते त्या धार्मिक बौध्द धर्माच्या रितीरिवाजाने तसे मेहकर येथील यशोधरा महीला मंडळ, आनंद बुध्द विहार, आशोक भवन यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक २० आक्टोंबर २४ रोज रविवारला सकाळी ८ ते संध्याकाळी १० वाजे पर्यंत डॅा. बाबासाहेब आंबेडकर वाटीका, मेहकर जिल्हा बुलडाणा येथे ग्रंथ समापण सोहळा व धम्म मेळावा होणार आहे. या धम्म मेळाव्याचे व ग्रंथ समापण सोहळ्याचे उद्दघाटन बुलढाणा जिल्ह्याची आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई आशांत वानखडे करनार असून प्रमुख उपस्थितीत म्हणून आंबेडकरी चळवळीचे आंदोलन सम्राट भिमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटनिस तथा मेहकर अर्बनचे डायरेक्टर भाई कैलास सुखदाने, भिमशक्तीचे विदर्भ सरचिटनिस किशोरदादा गवई व उपविभागीय अभियंता विजय मोरे हे राहणार आहे.या ग्रंथ समापण व धम्म मेळाव्यात पुज्यनिय भिक्कू संघ भंत्ते ज्ञानज्योती महाथेरो चंद्रपूर (ताडोबा), भंत्ते ज्ञानरक्षीत, भत्ते गुणरत्न महाथेरो नंदुरबार, भंत्ते महेंद्रयोधी थेरो (ईसोली), भंत्ते शिलरत्न थेरो नाशिक, भंत्ते शासन प्रिती थेरो (लोणार), भंत्ते काश्यप लि.नागपूर, भंत्ते राज प्रती टेंभुर्णी, भत्ते काश्यप मेहकर हे उपस्थीत राहून धम्मदेशना देणार आहे.सकाळी धम्मध्वजाचे ध्वजारोहण, सामुहीक पंचशिला, भिक्कू संघाचे स्वागत नंतर भिक्कू संघाची धम्मदेशना झाली की, भिक्कू संघाला भोजनदान दिले जाईल भोजनदान झाले की, आंबेडकर चळवळीतील उपस्थीत नेते, कार्यकरत्यांचे सत्र व मार्गदर्शन होऊन दुपारी उपस्थित उपासक, उपासिकाना स्नेहभोजन होऊन झाले की, नंतर महाराष्ट्रातील नामवंत कवी, गायकांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करूण सन्मानपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी शाहीर संघपाल गवई व गायीका आरती शरद इंगळे यांचा बुध्द भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. मेहकर येथील या ऐतिहासीक कार्यक्रमास बौध्द उपासक, उपासीका बाल बालीकांनी हाजोरोच्या संख्येने उपस्थीत राहून भिक्कू संघाची धम्मदेशना, मार्गदर्शन, आशिर्वाद घ्यावे व बुध्द भिमगीतांचा आस्वाद घ्यावा असे आव्हान आयोजक व मेहकरचे भूमी पुत्र भाई कैलास सुखदाने यांनी केले आहे.
Offcanvas menu