सिंदखेडराजा/ प्रतिनिधी आज निवडणूकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, निवडणूक घोषित होताच सिंदखेड राजा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रा.संजय खडसे यांनी तात्काळ निवडणूक विभागाचे नोडल अधिकारी यांची सभा घेऊन सदर सभेमध्ये निवडणूक आचारसंहिता बाबत सुचना दिल्या व आचारसंहिता चे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे सुचवले. तसेच मतदार संघातील केंद्र निहाय माहीती घेऊन तेथील सुविधेसाठी योग्य ती कार्यवाही गटविकास अधिकारी व नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिल्या. सदर सभेस अजित दिवटे तहसीलदार सिंदखेडराजा, मुकेश माहोर गटविकास अधिकारी देऊळगाव राजा, प्रशांत व्हटकर मुख्याधिकारी नगर परिषद सिंदखेडराजा, प्रविण वराडे, आस्मा मुजावर नायब तहसीलदार सिंदखेडराजा, अंकुश म्हस्के कृषी अधिकारी सिंदखेडराजा, राजेश पवार, भास्कर घुगे विस्तार अधिकारी सिंदखेडराजा हे उपस्थित होते.
Offcanvas menu